Sunil Tingre: धाकधूक वाढली! वडगाव शेरी भाजपाच्या वाट्याला? सुनील टिंगरेंनी घेतली दादांची भेट

Vadgaon Sheri Assembly Constituency 2024: भाजपकडून सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यास विरोध होत असल्याचं बोलले जात आहे. टिंगरे यांना उमेदवारी दिल्यास पोर्षे अपघात प्रकरणाचं भांडवल विरोधी पक्ष करेल अशी काहीशी शक्यता भाजपच्या नेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
Ajit Pawar- Sunil Tingre
Ajit Pawar- Sunil Tingresarkarnama
Published on
Updated on

Pune News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेनेची (शिंदे गट) देखील आज पहिली यादी येण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत पुण्यातील तीन जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत.

महायुतीकडून अद्याप शहरातील पाच जागांवर उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजप आपल्याकडे घेऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी आज देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे भाजपाच्या वाट्याला तर दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला येणार असल्याचं जवळपास निश्चित मानले जात आहे. भाजपाच्या वाटेला येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी पर्वती, कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा भाजपने केली आहे.

कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्स अध्यापही कायम आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा भाजप आपल्याकडे घेऊन खडकवासला विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाला देऊ शकतो, अशा चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.

Ajit Pawar- Sunil Tingre
Chandgad Assembly Election : शरद पवारांच्या उमेदवाराला विरोध; आघाडीत बिघाडी?

कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचं आरोप त्यांच्यावर झाले होते. नुकताच शरद पवारांनी वडगाव शेरी मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत सुनील टिंगरे यांच्यावर अपघात प्रकरणावरून निशाणा साधला होता. त्यामुळे सुनील टिंगरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून भाजपकडून सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यास विरोध होत असल्याचं बोलले जात आहे.

सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिल्यास पोर्षे अपघात प्रकरणाचं भांडवल विरोधी पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात करेल अशी काहीशी शक्यता भाजपच्या नेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

वडगाव शेरीची जागा भाजपाला सोडावी, असा प्रस्ताव भाजपाकडून अजित पवारांकडे देण्यात आल्याच्या चर्चा देखील गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्या पार्श्वभूमी वर आमदार सुनील टिंगरे यांनी अजित पवारांची तातडीने भेट घेतली आहे.

आपल्याला पुन्हा संधी मिळावी यासाठी ते दादांच्या भेटीला गेले असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आज किंवा उद्या येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या यादीमध्ये सुनील टिंगरे यांची उमेदवारी निश्चित होणार का ?त्यांचा पत्ता कट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com