Surendra Pathare: 'साहेब दैवत आहेत, असं म्हणणारे त्यांना का सोडून गेले'; सुनील टिंगरेंची पठारेंनी उडवली खिल्ली

Vadgaonsheri Assembly Constituency 2024 Surendra Pathare on Sunil Tingre:सुरेंद्र पठारे यांच्यासह बापूसाहेब पठारेंनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेंद्र पठारे यांनी आज पुण्यात मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली.
Vadgaonsheri Assembly Constituency 2024
Vadgaonsheri Assembly Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचे विरोधक माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे (Surendra Pathare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पठारे पिता-पुत्र आणि दहा माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील तीन माजी नगरसेवक, सुरेंद्र पठारे यांच्यासह बापूसाहेब पठारेंनी शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेंद्र पठारे यांनी आज पुण्यात मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांची खिल्ली उठवली.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी खराडी येथील सभेत आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावर सुनील टिंगरे यांनी 'साहेब आमचे दैवत आहे. त्यांना आमचा कान पकडण्याचा अधिकार आहे, मी त्यांच्या टीकेला उत्तर देणे मला शोभत नाही," अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याला सुरेंद्र पठारे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "साहेब दैवत आहेत, असे ते म्हणतात, मग साहेबांना ते का सोडून गेले," असा टोला सुरेंद्र पठारे यांचा सुनील टिंगरे यांना टोला लगावला.

सुरेंद्र पठारे म्हणाले, "भावनिकतेच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी बोलण्यासारख्या असतात. खरंच जर साहेबांना दैवत मानलं असतं तर साहेबांना कधीही सोडून गेले नसते.साहेबांना सोडून गेलेले लोकांना न पटलेलं असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत लोकांनी ते दाखवून दिले.

Vadgaonsheri Assembly Constituency 2024
Killari Earthquake 31 Years: 'त्या' काळरात्रीची आठवण आजही लोकांच्या जिवाचा थरकाप उडवते...!

" विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने अनेक पदाधिकारी शरद पवारांची भेट घेत आहे.वडगाव शेरी मतदारसंघात दोन दिवसापूर्वी महान निर्धार मेळावा सुरेंद्र पठारे यांनी आयोजित केला होता. आज सुरेंद्र पठारे यांनी शरद पवारांची मोदी बागेत भेट घेतली. यावेळी पठारी माध्यमांशी बोलत होते.

पठारे पिता-पुत्र पैकी कुणालाही शरद पवारांनी उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि भाजपचे नेते, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वडगावशेरी मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांना जोरदार लढत देण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

'शरद पवार आमचे दैवत आहेत हे वेळोवेळी अजित पवारही भाषणांमधून आता सांगत असले तरी शरद पवारांनी वडगावशेरीच्या मेळाव्यात सुनील टिंगरे यांचा 'दिवट्या' आमदार म्हणून उल्लेख केला होता. त्यावर आमदार सुनील टिंगरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. साहेब आमचं दैवत आहेत. अनौपचारिक गप्पांमध्ये मला दैवत म्हणणाऱ्यांना दैवत शब्द आता कळायला लागलाय का असं शरद पवार यांनी सुनील टिंगरे आणि अजित पवारांवर ती उल्लेख करत दैवत शब्दावर भाष्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com