जिल्हा बॅंकेला डावलल्यानंतर वैशाली नागवडे म्हणाल्या, ‘मी कुठे कमी पडले’!

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीची उमेदवारी वैशाली नागवडे यांना नाकारली
Vaishali Nagwade
Vaishali NagwadeSarkarnama
Published on
Updated on

केडगाव (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (pdcc bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे यांनी समाज माध्यमांवर ‘मी कुठे कमी पडले’ अशी पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमुळे आज (ता. १०) नागवडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ((ncp)) डावलले, अशी चर्चा दौंड तालुक्यात सुरू आहे. (Vaishali Nagwade's rejected the candidature of Pune District Central Co-operative Bank)

नागवडे या गेली एकवीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (ncp) एकनिष्ठ आहेत. पवार कुटुंबीयांतील प्रत्येक नेत्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. या सबंधांमुळेच राष्ट्रवादीने त्यांना पंचायत समितीचे सदस्य, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद, महानंदाचे अध्यक्षपद, पंचायतराज कमिटीचे अध्यक्षपद, प्रदेश सरचिटणीस अशी पदे बहाल केली आहेत.

Vaishali Nagwade
‘बबड्या’ जेरबंद असल्याने यंदा ‘डॅडी’चं काय होणार!

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत नागवडे यांचा 350 मतांनी पराभव झाला होता. हा पराभव पक्षांतर्गत गटबाजीमुळे झाला, असे त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांचे मत आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीही नागवडे या तीव्र इच्छुक होत्या. मात्र त्यावेळीही त्यांना डावलण्यात आले होते. आता पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतही पक्षाने नागवडे यांना महिला वर्गातून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितला होता. नागवडे यांचे समर्थक या वेळी प्रचंड आशावादी होते. परंतु जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही नागवडे यांना डावलले गेल्याने समर्थक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

Vaishali Nagwade
तीन मंत्री, चार आमदार असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे पॅनेल जाहीर : हवेलीत मैत्रीपूर्ण लढत

नागवडे यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. रास्ता रोको आंदोलनात सर्वात आधी रस्त्यावर बसणाऱ्या त्या महिला कार्यकर्त्या आहेत. कोरोना काळात दौंडमध्ये त्या राष्ट्रवादीतील सर्वाधिक मदत करणाऱ्या पदाधिकारी म्हणून त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. महिला बचत गट, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

Vaishali Nagwade
काँग्रेसने साथ सोडलेले रवींद्र भोयर एकटेच मतदानाला आले!

बारामती आणि हवेली तालुक्यात 3-3 इच्छुकांना उमेदवारी मिळाली आहे. दौंड तालुका हा जिल्हा बँकेला सर्वाधिक नफा देणारा तालुका असूनही गेली अनेक वर्ष तालुक्याची एकाच संचालकावर बोळवण केली जात आहे. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. पण ते उघडपणे बोलू शकत नाहीत. उमेदवारीसाठी तालुक्याचा पाठिंबा कमी पडला की इतर काही कारणे आहेत, यावर सध्या चर्चा सुरू आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात वैशाली नागवडे म्हणाल्या की, ‘‘ पुणे जिल्हा बँक निवडणुकीत मला उमेदवारी मिळाली नाही; म्हणून मी पक्षावर किंवा नेत्यांवर नाराज नाही. उलट मी कुठे कमी पडले, त्यावर आत्मपरीक्षण करणार आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com