तीन मंत्री, चार आमदार असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे पॅनेल जाहीर : हवेलीत मैत्रीपूर्ण लढत

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे अधिकृत पॅनेल जाहीर
Congress-NCP
Congress-NCPSarkarnama
Published on
Updated on

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pdcc bank) संचालकाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्या एकत्रित सहकार पॅनेलची घोषणा शुक्रवारी (ता. १० डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. यात ‘अ’ वर्गातून बारामती, आंबेगाव, भोर, पुरंदर, वेल्हे व मावळ तालुक्यांतील बिनविरोध संचालक झालेल्या सहा जणांसह उर्वरित खेड, शिरुर, दौंड, जुन्नर, मुळशी व इंदापूर या तालुक्यांतील ६ उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी अर्ज भरलेल्या इतर इच्छुकांनी आता जाहीर उमेदवारांसाठी ताकदीने उतरण्याची सूचनाही पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. (Official panel of Congress-NCP announced for Pune District Bank election)

उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), आमदार संग्राम थोपटे (भोर), आमदार संजय जगताप (पुरंदर), रेवणनाथ दारवटकर (बेल्हे), ज्ञानोबा दाभाडे (मावळ) यांची जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान खेडमधून आमदार दिलीप मोहिते, शिरूरमधून आमदार अशोक पवार, दौंडमधून बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात, जुन्नरमधून संजय काळे, मुळशीतून सुनील चांदेरे (मुळशी), इंदापूरमधून रणजित बाबूराव निंबाळकर यांची अ गटातून उमदेवारी जाहीर करण्यात आली आहे.

Congress-NCP
बाजोरिया-भाजपचे अग्रवाल यांच्यात वाद झालेल्या अकोल्यात ९९ टक्के मतदान

दरम्यान ब गटातून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (इंदापूर), क वर्गातून सुरेश घुले (हवेली), ड वर्ग मतदारसंघातून डॉ. दिगंबर दुर्गाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अनुसुचित जाती-जमाती मतदारसंघातून हवेलीचे प्रवीण बाजीराव शिंदे, इतर मागास प्रवर्गातून बारामतीचे संभाजी होळकर, विमुक्त व भटक्या जाती, जमाती मतदारसंघातून दत्तात्रेय महादेव येळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महिला गटातून जुन्नरच्या पूजा संभाजी बुट्टे पाटील आणि वेल्ह्यातील निर्मला कृष्णा जागडे यांना संधी देण्यात आली आहे.

Congress-NCP
काँग्रेसने साथ सोडलेले रवींद्र भोयर एकटेच मतदानाला आले!

म्हस्के-दांगट यांच्यात लढत होणार

राष्ट्रवादी काँग्रेसला बारा तालुक्यांतील अ वर्ग मतदार संघातील उमेदवारीचा तिढा सोडविण्यात यश आले. पण हवेली तालुका मतदार संघात मात्र काही केल्या तिढा सोडविण्यात यश आले नाही. त्यामुळे अखेर बॅंकेचे ज्येष्ठ संचालक प्रकाश म्हस्के व पुणे मनपाचे माजी नगरसेवक विकास दांगट या दोघांमधील लढतीत जो विजयी होईल, तो आपलाच या सूत्राने पक्षाकडून ही लढत मैत्रीपूर्ण होईल, असे जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com