Vaishnavi Hagawane Case : हगवणेच्या वकिलांचा जुना कारनामा आला समोर; थेट सरकारी वकिलांच्या कॉलरला घातला होता हात

Vipul Dushing's Legal Role in the Hagawane Family : सध्या सुरु असलेल्या वैष्णवी मृत्यू प्रकरणात दुशींग यांनी युक्तिवाद करताना मृत वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला आहे.
Vipul Dushing, lawyer representing the Hagawane family, is now in the spotlight due to a past clash with a government lawyer.
Vipul Dushing, lawyer representing the Hagawane family, is now in the spotlight due to a past clash with a government lawyer. Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हगवणे कुटुंबीयांची बाजू सध्या न्यायालयात अ‍ॅडव्होकेट विपुल दुशींग मांडत आहेत. मात्र, या वकिलांचे पूर्वीचे काही कारनामे आता समोर आले आहेत. या वकिलांवरच पूर्वी सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गंभीर आरोप असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या सुरु असलेल्या वैष्णवी मृत्यू प्रकरणात दुशींग यांनी युक्तिवाद करताना मृत वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अनेक स्तरांवर संताप व्यक्त होत असून, ज्या व्यक्तीवर स्वतः न्यायालयात गैरवर्तनाचा गुन्हा दाखल आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचा युक्तिवाद केला जाणे, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणात आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकिलाची भूमिका आणि त्यांची पार्श्वभूमी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. ही घटना 2022 साली पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात घडली होती. त्या वेळी अ‍ॅडव्होकेट दुशींग एका गुन्हेगारी प्रकरणात आरोपीच्या बाजूने वकिली करत होते. सुनावणीदरम्यान पुढील तारीख कोणती ठेवायची, यावरून त्यांचा सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्याशी वाद झाला होता.

Vipul Dushing, lawyer representing the Hagawane family, is now in the spotlight due to a past clash with a government lawyer.
Vaishnavi Hagawane: हगवणेंच्या बैलासमोर डान्स केल्याच्या VIDEO वर गौतमी पाटील म्हणाली..

वाद इतका टोकाला गेला की, न्यायालयाबाहेर पडल्यावर दुशींग यांनी अग्रवाल यांची कॉलर पकडली आणि त्यांना शारीरिक मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर अग्रवाल यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अ‍ॅड. दुशींग आणि त्यांच्यासोबत असलेल्या आणखी दोन वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने दुशींग यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला, त्यामुळे त्यावेळी अटक टळली होती.

Vipul Dushing, lawyer representing the Hagawane family, is now in the spotlight due to a past clash with a government lawyer.
Vaishnavi Hagawane Case : हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन; पोलिस धावतपळत गेले अन्...

दरम्यान, वैष्णवीच्या वडील अनिल कस्पटे यांनीही दुशिंग यांनी मुलीवर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी कॅमेरासमोर बोलताना त्यांना रडूही कोसळले. दुशिंग यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेणे अयोग्य आहे. आमच्या मृत्यू झालेल्या मुलीबाबत त्यांनी असे बोलू नये, असे आवाहन कस्पटे यांनी वकिलांना केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com