Vaishnavi Hagwane case : मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, ‘’कुणालाही दबाव आणू देणार नाही अन्...’’

Devendra Fadnavis News : महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे, जाणून घ्या, मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर कशी दिली प्रतिक्रिया?
Maharashtra CM Devendra Fadnavis addresses the media on the Vaishnavi Hagwane death case, assuring strict action and dismissing any external influence in the investigation.
Maharashtra CM Devendra Fadnavis addresses the media on the Vaishnavi Hagwane death case, assuring strict action and dismissing any external influence in the investigation. sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Reacts to Vaishnavi Hagwane Death Case : पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी कस्पटे-हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, तिचा पती, सासरा, सासू, नणंद, दीर यांना अटक झाली आहे. तर जालिंदर सुपेकर हे वैष्णवी हगवणेचे मामे-सासरे असून, त्यांनी सुशीलला पिस्तूल परवाना मिळवून दिल्याचा आरोप केला जात आहे. पिस्तूल परवान्यासाठी सुशीलने चुकीचे पत्ते दिल्याने त्याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 दरम्यान सुपेकर यांच्यावर आरोप झाल्यानंतर गृहविभागाने त्यांच्याकडील कारागृह विभागाची जबाबदारी काढून घेतली आहे. यासंदर्भात फडणवीस यांनी सुपेकर यांच्यावरील तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

याशिवाय विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी चुकीच्या पद्धतीने सुशील हगवणेला पिस्तुलला परवाना मिळवून दिल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. त्याची तपासणी सुरु आहे. जर तथ्य आढळले तर सुपेकर यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणात कोणालाही दबाव आणू देणार नाही आणि कोणालाही सोडणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मीडियाशी बोलताना स्पष्ट केले.

Maharashtra CM Devendra Fadnavis addresses the media on the Vaishnavi Hagwane death case, assuring strict action and dismissing any external influence in the investigation.
Fighter jet generations : फायटर जेट्सच्या 4th, 4.5th अन् 5th जनरेशनची वैशिष्ट्ये काय अन् भारताचे 'राफेल' कोणत्या जनरेशनचे?

याशिवाय, वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणेचा मित्र नीलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली त्याबाबत फडणवीस म्हणाले, नीलेश चव्हाण हा नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, योग्य पद्धतीने शोधमोहीम राबवून त्याला नेपाळ भारत सीमेवर पोलिसांनी पकडले आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगत आहे की या प्रकरणात जे कोणी सहभागी आहेत. त्यापैकी कोणालाही सोडणार नाही. या प्रकरणात कोणीही दबाव आणू नये व कोणीही गडबड करू नये यादृष्टीने आम्ही काही निर्णय घेतले आहे. पुणे पोलिसांनी पिस्तूल परवाना दिल्याबद्दल आढावा घेण्यात येत आहे. चुकीची परवानगी दिली असले तर त्‍या रद्द केल्या जातील.

Maharashtra CM Devendra Fadnavis addresses the media on the Vaishnavi Hagwane death case, assuring strict action and dismissing any external influence in the investigation.
ED officer arrested : २० लाखांची लाच घेताना ‘ED’च्या उपसंचालकास 'CBI'ने कार्यालयातच रंगेहाथ पकडलं

चाकणकरांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काय प्रतिक्रिया? -

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून, त्याबाबत विचारले असता त्यावर फडणवीस यांनी स्मित हास्य करत यावर भाष्य करणे टाळले. तर महाराष्ट्र राज्य आयोगातील सहा सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या लवकरच राज्य सरकारकडून भरल्या जातील असेही फडणवीस यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com