Vanraj Andekar : वनराजसह शिवम आंदेकरही होता हल्लेखोरांच्या निशाण्यावर, 'एकावर एक फ्री'चा प्लॅन असा फसला

Vanraj Andekar Case : वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक आणि वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय आहे. त्यादृष्टीनं पोलिसांकडून तपास सुरू आहे.
vanraj andekar | shivam andekar
vanraj andekar | shivam andekar sarkarnama
Published on
Updated on

Vanraj Andekar Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा रविवारी ( 1 सप्टेंबर ) रात्री खून करण्यात आला होता. 13 जणांच्या टोळक्यानं वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर कोयत्यानं वार केले होते. यात आंदेकर यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता. आता आंदेकर यांच्या खूनप्रकरणी बहीण, दोन मेहुणे आणि सोमनाथ गायकवाड आणि काही आरोपींना अटक केली आहे. मात्र, थरारक घटनेची माहिती समोर आली आहे.

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाला, चुलतभाऊ शिवम हा सुद्धा त्यांच्यासोबत होता. यावेळी 'एकवर एक फ्री बोनस' म्हणत हल्लेखोरांनी शिवम याच्यावर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवम थोडक्यात बचावला, असं बंडू आंदेकरने फिर्यादीत म्हटलं आहे.

नेमकं घडलं काय?

वनराज आंदेकर आणि त्यांचा चुलतभाऊ शिवम आंदेकर, हे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी सहा गाड्यांवरून आलेल्या 13 जणांनी बेसावध असलेल्या वनराज आंदेकर आणि शिवम आंदेकर यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांपैकी पवन करतालने प्रथम शिवमवर गोळी झाडली. परंतु, शिवम खाली बसल्यानं बचावला.

vanraj andekar | shivam andekar
Vanraj Andekar Shot Dead: VIDEO वनराज आंदेकर यांच्या हत्येचा थरार; नेमकं काय घडलं?

त्यानंतर पवनने वनराज यांच्या दिशेने गोळी झाडली. त्याचवेळी दुसरा हल्लेखोर समीर काळे याने वनराजच्या दिशेने गोळ्या झाडल्या. ते दोघे पळून जात असताना वनराज यांच्या बहीण संजीवनी आणि मेहुणा जयंत कोमकर बाल्कनीतून 'मारा, मारा, त्यांना सोडू नका, जीवे ठार मारा,' अशी चिथावणी देत होते. तेव्हा, 'एकावर एक फ्री बोनस' म्हणत पवनने शिवमच्या अंगावर धावून गेला. मात्र, शिवम पळून गेला.

vanraj andekar | shivam andekar
Vanraj Anderkar : 5 राऊंड फायर केले, पण वनराज आंदेकरांचा मृत्यू गोळीबारानं नाही, मग कसा झाला?

वनराज खाली पडल्यानंतर पवन, समीर आणि त्यांच्या साथीदारांनी वनराज यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात वनराज यांचा मृत्यू झाला, असं बंडू आंदेकर यांनी फिर्यादीत म्हटलं.

पाच जणांना अटक....

वनराज आंदेकर यांच्या खूनप्रकरणी सोमनाथ उर्फ सोम्या गायकवाड मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असून त्याच्यासह आंदेकरांची बहीण संजीवनी जयंत कोमकर, जयंत लक्ष्मण कोमकर, प्रकाश लक्ष्मण कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर यांना अटक केली आहे.

13 जण ताब्यात...

आंदेकर खून प्रकरणात 13 संशयितांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. हल्लेखोरांच्या तपासासाठी 20 पथके नियुक्त केली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com