Vasant More : 'वंचित'मध्ये शेवटच्या श्वासापर्यंत राहणार होतो पण...; वसंत मोरेंचा मोठा खुलासा, म्हणाले...

Vasant More On VBA : 'वंचित'मध्ये माझा श्वास घेण्याचा प्रयत्न केला असं विधान केलं आहे. त्यामुळे वंचित आणि वसंत मोरे यांच्यातील संघर्ष बळवण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटांमध्ये प्रवेश केला आहे.
Prakash Ambedkar, Vasant More, Raj Thackeray, Uddhav Thackeray
Prakash Ambedkar, Vasant More, Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News, 22 Sep : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) राहून आपल्याला पुणे लोकसभेची निवडणूक लढवता येणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर मनसेला सोडचिट्टी देत वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पुणे लोकसभेची (Pune Lok Sabha) निवडणूक लढवली.

यावेळी वसंत मोरे आपण शेवटच्या श्वासापर्यंत 'वंचित'मध्येच राहणार असल्याचं म्हणाले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी आता शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला असून विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत.

दरम्यान 'वंचित'मध्ये माझा श्वास घेण्याचा प्रयत्न केला असं विधान केलं आहे. त्यामुळे वंचित आणि वसंत मोरे यांच्यातील संघर्ष बळवण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटांमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता खडकवासला विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्याची तयारी वसंत मोरेंनी दर्शवली आहे.

महाविकास आघाडीमधून हा मतदारसंघ शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला सुटला तर या मतदारसंघामधून आपण विजयी होऊ असा विश्वास मोरेंनी व्यक्त केला आहे. दरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना वंचितच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या आरोपाबाबत वसंत मोरेंनी खुलासा केला.

ते म्हणाले, पुणे शहरांमध्ये माझ्यापेक्षा मोठमोठी लोक आहेत. ज्यांनी चार-चार पक्ष बदलले आहेत. त्यांच्याबाबत हे प्रश्न उपस्थित होत नाहीत. माझ्या बद्दलच ते का होतात? कारण, 'मार्केट में वही टिकता है जो ज्यादा चलता है.' माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिथे राहणार असं मी बोललो होतो. मात्र. त्यांनी तिथेच माझा शेवटचा श्वास घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय करायचं?

तो विषय झाला असून त्यात बोलण्यासारखं काही नाही. ही गोष्टी त्यांनी आणि मीही स्वीकारली आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत अथवा डोळे बंद होईपर्यंत जे काही मी बोललो असेल असं अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात. त्यावेळी बोललो होतो. त्यानुसार ज्या पद्धतीने मला तिथे मतदान होईल ज्या पद्धतीने मी निवडून येईल यावर त्या गोष्टी आधारित होत्या.

Prakash Ambedkar, Vasant More, Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray : पाकिस्तानी कलाकाराच्या चित्रपटाला राज ठाकरेंचा कडाडून विरोध; म्हणाले, कलेला देशांच्या सीमा नसतात, पण...

या सर्व गोष्टीला आता तीन महिने झाले असून आता माझ्यासमोर विधानसभेचा नवीन अध्याय आहे. त्यानंतर महापालिका येणार आहेत. त्यामुळे वरिष्ठ जी मला जबाबदारी देतील ती योग्यरीत्याने पार पाडायची आहे. सध्या मला राज्य संघटक करण्यात आलं आहे. पुण्यामध्ये मी एकमेव राज्य संघटक असून ती मोठी जबाबदारी माझ्यावरती सोपवण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटामध्ये मोकळा श्वास घेता येतोय का? असा प्रश्न विचारला असता वसंत मोरे म्हणाले, मला शिवसेनेत मोकळा श्वास घेता येतोय कारण मी मूळचा शिवसैनिक आहे. 2006 पर्यंत मी शिवसेनेमध्येच होतो. त्यानंतर मनसेची निर्मिती झाली आणि मी राज साहेबांसोबत गेलो. मात्र माझं मूळचा फाउंडेशन हे शिवसेनेचाच असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.

Prakash Ambedkar, Vasant More, Raj Thackeray, Uddhav Thackeray
Nilesh Lanke : 'त्यांच्याशी हात मिळवणी कधीच करत नसतो'; खासदार लंकेंनी बारामतीतून कोणाला डिवचलं

वंचितबाबत नेमकं काय म्हणाले होते वसंत मोरे?

जे प्रेम मागील 32 दिवसांमध्ये मला वंचित बहुजन आघाडीमध्ये मिळालं ते प्रेम गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मला मनसेमध्ये मिळालं नाही. अठरा वर्ष मनसे आणि पहिली सात वर्ष शिवसेना असा माझा प्रवास आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं.

मात्र पुण्यातील स्थानिक नेत्यांनी माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. या कारणांमुळे रवींद्र धंगेकर आणि मी देखील पक्षातून बाहेर पडलो. त्यामुळे शहरातील या पदाधिकाऱ्यांचा भविष्यात हिशोब होई, असं वसंत मोरे म्हणाले होते.

तर आता वंचितमध्ये दाखल झाले आहे. परंतु ते कायमस्वरूपी आता 'वंचित'मध्ये राहणार का? असा प्रश्न विचारला असता वसंत मोरे म्हणाले, "मी शंभर टक्के वंचित बहुजन आघाडी मध्येच राहणार आहे. याबाबतचं स्टेटमेंट मी ऑन स्टेज केला आहे. जोपर्यंत माझे डोळे उघडे आहेत. तोपर्यंत मी वंचित बहुजन आघाडी सोडणार नाही." असं ते म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com