Prakash Ambedkar Akshay Shinde
Prakash Ambedkar Akshay ShindeSarkarnama

Akshay Shinde Encounter : 'ती' गोळी पोलिसाच्या मांडीला कशी लागली? प्रकाश आंबेडकरांची मेडिकल रिपोर्टची मागणी

Prakash ambedkar Badlapur Case Thane Police : सरकारने तातडीने याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे. त्या अधिकाऱ्याचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करावा, अशी मागणी आंबेडकरांनी केली.
Published on

Pune News : बदलापूरमधील दोन चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील या घटनेबाबत काही प्रश्न उपस्थित करत सरकारला सवाल केला आहे.

बदलापूर प्रकरणामध्ये महायुती सरकार आरोपीला वेळेत पकडण्यात कमी पडले आहे. अनेक दिवस आरोपींना पकडण्यात आलं नाही. यंत्रणांकडून आरोपी आणि त्याला मदत करणारे कसे मोकळे सुटतील यासाठी प्रयत्न करण्यात आले, असे आरोप आंबेडकरांनी केले आहेत.

Prakash Ambedkar Akshay Shinde
PI Sanjay Shinde : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारे संजय शिंदे कोण आहेत? प्रदीप शर्मांच्या टीममध्ये गाजवली कारकीर्द...

पोलिसांकडून आरोपीला दुसऱ्या केस संदर्भात चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने रिव्हॉल्वर हिसकावून तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पोलिस कर्मचाऱ्याला लागल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेबाबत संशयाचा वातावरण निर्माण झाला आहे, असे आंबेडकर म्हणाले.

संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी सरकारने याबाबत माहिती द्यायला हवी. एका पोलीस अधिकाऱ्याला मांडीत गोळी लागली आहे. फायरिंग करणारा माणूस हा समोर फायरिंग करतो. त्यामुळे ती गोळी मांडीला कशी लागली, हा सुद्धा एक प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. सरकारने तातडीने याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे. त्या अधिकाऱ्याचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करावा, अशी मागणी आंबेडकरांनी केली.

Prakash Ambedkar Akshay Shinde
Akash Shinde Encounter : 'एन्काऊंटर न्याय' महायुती सरकारच्या अंगलट येणार

आरोपीला दुसऱ्या केसच्या चौकशीसाठी घेऊन जाण्यात येत होते, ती केस त्याच्या पत्नीला मारहाण केल्या संदर्भात असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्या आरोपीला नेमकं कशाच्या शोधासाठी घेऊन जाण्यात येत होतं, याचा देखील खुलासा येणे आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांनी अथवा शासनाने केला नाही तर या आरोपीचा बळी हा कोणालातरी वाचवण्यासाठी दिलाय, अशी चर्चा कायम राहील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com