PI Sanjay Shinde : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारे संजय शिंदे कोण आहेत? प्रदीप शर्मांच्या टीममध्ये गाजवली कारकीर्द...

Akshay Shinde Encounter Badlapur Case Encounter : अक्षय शिंदे याचा सोमवारी रात्री ठाण्यात पोलिस व्हॅनमध्येच एन्काऊंटर करण्यात आला आहे.
Akshay Shinde
Akshay ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : बदलापूरमधील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा सोमवारी रात्री पोलिसांनी एन्काऊंटर केला. ज्यांच्या पिस्तूलातून झाडलेल्या गोळीने शिंदेचा मृत्यू झाला ते पोलिस निरीक्षक आहेत संजय शिंदे. या कारवाईमध्ये संजय शिंदे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे हेही जखमी झाले आहेत.

पोलिस अक्षय शिंदेला तळोजा जेलमध्ये बदलापूरला नेत होते. यादरम्यान पोलिस व्हॅनमध्येच अक्षयने पोलिसांकडील पिस्तूल हिसकावून घेत गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी जीव धोक्यात घालून अक्षयला रोखण्यासाठी त्याच्या दिशेने गोळी झाडली. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला.

Akshay Shinde
Akshay Shinde Case : "अक्षयच्या 'एन्काऊंटर'वरून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणं दुर्दैव"

कोण आहेत संजय शिंदे?

अक्षयवर गोळी झाडणारे संजय शिंदे हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट आहेत. माजी आयपीएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या टीममध्ये त्यांनी काम केले आहे. त्याकाळी एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिध्द असलेल्या प्रदीप शर्मा यांनी 100 हून अधिक आरोपींचा एन्काऊंटर केला आहे. याच टीममध्ये शिंदेही होते. याच टीमने गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केली होती.

संजय शिंदे हे सध्या ठाणे पोलिस दलात असून बदलापूर घटनेच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआय़टीचे सदस्य आहेत. यापूर्वी ते अनेकदा वादातही अडकले आहेत. एका हत्येच्या प्रकरणातील आरोपी विजय पालांडे पोलिस कस्टडीतून बळून गेला होता. त्याला मदत केल्याचा आरोप संजय शिंदे यांच्यावर होता.

Akshay Shinde
Akshay Shinde Encounter: अक्षयचे हात बांधलेले, तोंडावर बुरखा होता, नक्की काय घडले? 'एन्काऊंटर' हा शिंदे-फडणवीसांचा बनाव

दरम्यान, अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर पोलिसांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. अक्षयने पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात त्याचा मृत्यू झाला आहे. बदलापूर घटनेबाबत पोलिसांकडे अक्षय़विरोधात ठोस पुरावे होते. दोन आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली असती, असेह निकम म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com