VBA News : राहुल गांधींच्या विरोधात वंचितचा मोर्चा असीम सरोदेंच्या कार्यालयावर, काँग्रेस नेते म्हणतात,'भाजपला...'

Rahul Gandhi Asim Sarode VBA : सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले की त्यांना या आंदोलनाविषयी काही माहीत नाही. मात्र, असे आंदोलन करण्याच्या कोणत्याही सूचना या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या नव्हत्या.
VBA march
VBA marchSARKARNAMA
Published on
Updated on

VBA News : काँग्रेस तेव्हाच आरक्षण संपवण्याचा विचार करेल जेव्हा देशातील प्रत्येकाला समान संधी मिळू लागेल. सध्या भारतात तशी परिस्थिती नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात केले होते.

त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यात अॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

असीम सरोदे हे काँग्रेसचे सदस्य नाहीत. मात्र, त्यांच्या कार्यालयावर वंचितकडून मोर्चा काढण्यात आल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून 'भाजपला फायदा होईल असे राजकारण वंचित बहुजन आघाडीतर्फे केले जाते, हे आपल्याला काही नवीन नाही. या आंदोलनाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा ते सिद्ध केलं आहे.' अशी टीका केली आहे.

'वंचित'ची भूमिका काय?

या आंदोलनासंदर्भात 'सरकारनामा'च्या प्रतिनिधीने वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांची संपर्क साधला. सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले की ते प्रवासात आहेत. त्यांना या आंदोलनाविषयी काही माहिती नाही. मात्र, असे आंदोलन करण्याच्या कोणत्याही सूचना या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या नव्हत्या.

सतेज पाटील काय म्हणाले?

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सतेज पाटील यांनी म्हटले आहे की, 'आमचे नेते राहुलजी गांधी यांनी आरक्षणाबाबत एका मुलाखतीत जे विधान केलं, त्याचा अत्यंत चुकीचा आणि विपर्यस्त अर्थ काढत वंचित बहुजन आघाडीने पुण्यात असीम सरोदे यांच्या ऑफिससमोर मोर्चाचे आयोजन केले आहे. राहुल गांधी यांची मुलाखत सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. त्या संपूर्ण मुलाखतीत राहुलजी एकदाही 'आरक्षण संपवण्याची गरज आहे' असं म्हटलेले नाहीत. असं असताना वंचित बहुजन आघाडीने त्या वक्तव्याचा स्वतःच्या सोयीने अर्थ लावून आंदोलन पुकारलं आहे. त्या आंदोलनात कोणताही संबंध नसताना असीम सरोदे यांना लक्ष्य केलं आहे.'

VBA march
Rahul Gandhi Caste: 'राहुल गांधी मुस्लिम आहेत की ख्रिश्चन? हे..' ; भाजप आमदाराचं मोठं विधान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com