Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

Vikram Gokhale : विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता.
Vikram Gokhale
Vikram Gokhalesarkarnama
Published on
Updated on

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे ७७ व्या वर्षी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज (शनिवारी) त्यांची प्राणज्योत मालवली. विविध क्षेत्रातील मान्यवर, त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा वर्षाव सुरू झाला आहे. (Vikram Gokhale passes away)

बुधवारी मध्यरात्रीपासून त्यांच्या निधनाचे वृत्त पसरले होते, पण ही अफवा असल्याचे त्यांच्या मुलीनं सांगितले होते. आज त्यांच्या कुटुंबियांकडून निधन झाल्याचे सांगण्यात आले. विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता.

Vikram Gokhale
Gujarat Election 2022 : आपचा शोले स्टाईल प्रचार ; " सो जा बेटा, केजरीवाल तुम्हें जेल में डाल देगा,"

बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोखले यांच्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू होते.

विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमी, चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या चतुरस्र अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विक्रम गोखले यांनी 1990 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत अग्निपथ, तसेच सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला 1999 मधील “हम दिल दे चुके सनम’ चित्रपटासह अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.

Vikram Gokhale
Ajit Pawar : "अजितजी अभी बस, अभी मुझे जाना है," ; अजितदादांनी सांगितला 'तो' किस्सा

२०१३ मध्ये त्यांना‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.त्यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. तसेच २०१७ मध्ये हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, २०१८ मध्ये पुलोत्सव सन्मानाने गौरवण्यात आले होते. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारानाही सन्मानित करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com