Mahayuti News : पाठिंब्याबाबत भाजपची चुप्पी, अधिकृत उमेदवार शिंदेंचा का दादांचा?

Purandar Assembly Latest update : दोन्ही बाजूने आपणच महायुतीच्या अधिकृत उमेदवार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे यातील नेमका अधिकृत उमेदवार कोण? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.
Vijay Shivtare, Ajit Pawar,  Sambhaji Zende
Vijay Shivtare, Ajit Pawar, Sambhaji Zende Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिंदेची शिवसेना हे एकत्रित महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. अस असताना देखील राज्यामध्ये चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होताना पाहायला मिळत आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून संभाजीराव झेंडे मैदानात आहेत. दोन्ही बाजूने आपणच महायुतीच्या अधिकृत उमेदवार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे यातील नेमका अधिकृत उमेदवार कोण? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार दौऱ्यावर आहेत. महायुती आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे भोर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार घोटावडे मुळशी येथे प्रचार सभा घेणार आहेत. मांडेकर यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यासोबतच शिवसेनेचे बंडखोर कुलदीप कोंडे आणि भाजपचे बंडखोर किरण दगडे पाटील यांच आव्हान आहे. त्यामुळे या बंडखोरी बाबत अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.

Vijay Shivtare, Ajit Pawar,  Sambhaji Zende
Maval Politics: बापू भेगडे- सुनील शेळके यांचे कार्यकर्ते भिडले; लोणावळ्यात राडा

त्यानंतर अजित पवार पुरंदर विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार आहेत. मतदारसंघांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर त्यांच्या विरोधात अजितदादांनी संभाजीराव झेंडे यांना मैदानात उतरवले आहे. संभाजीराव झेंडे (Sambhajirao Zende) यांच्या प्रचारासाठी आज अजित पवार भेकराईनगर आणि उरुळी देवाची या दोन ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. प्रचार सभेच्या कार्यक्रमांमध्ये संभाजीराव झेंडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा उल्लेख केला आहे.

तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले विजय शिवतारे देखील आपण महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत प्रचार करत आहेत. यामुळे मतदारांमध्ये नेमकं महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण याबाबत संभ्रम आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपची नेमकी भूमिका काय? असणार आणि भाजपचा पाठिंबा हा शिंदेंच्या उमेदवारांना असणार की दादांच्या याबाबत देखील वरिष्ठ पातळीवरून अद्याप कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपच्या (BJP) या चुप्पीमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे.

Vijay Shivtare, Ajit Pawar,  Sambhaji Zende
Raj Thackeray on Sharad Pawar : आरक्षण अन् जातीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचं शरद पवारांवर टीकास्त्र, म्हणाले...

दरम्यान लोकसभा निवडणुकी वेळी विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांच्या उमेदवारा विरोधात दंड थोपटले होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि शिवतारे यांच्यामध्ये तह घडून आणला. आणि शिवतारेंनी निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेतला. मात्र हा तह विधानसभेला टिकला नसल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आता अजित पवार आजच्या सभांमध्ये शिवतारे यांच्याबाबत काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com