चक्क व्हॉटस ॲप स्टेट्‌स ठेवत शिवतारेबापूंनी दाखवलं अजितदादांवर आपलं ‘प्रेम’!

‘अजितदादांवर कोणीही टीका करू नये, ते राज्याचे नेते आहेत, याचे भान ठेवा’ अशी सूचनाही कार्यकर्त्यांना केली आहे.
Ajit Pawar-Vijay shivtare
Ajit Pawar-Vijay shivtareSarkarnama

पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पुरंदरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यातील सख्य पुण्याबरोबरच सर्व राज्याला परिचित आहे. अगदी महाविकास आघाडीत एकत्र असतानाही शिवतारेंनी अजितदादांवर निशाणा साधणं थांबवलं नव्हतं. पण, आता त्याच शिवतारे बापूंनी अजितदादांविषयी विशेष ‘प्रेम’ दाखवत अजितदादांचं स्टेट्‌स व्हॉट्‌स ॲपर ठेवत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. अर्थात, हे त्यांचे प्रेम उपरोधिकपणाचेच असण्याची शक्यता अधिक आहे. (Vijay Shivtare congratulated Ajit Pawar on his election as Leader of Opposition)

मागील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये विजय शिवतारे हे राज्याचे जलसंधारण मंत्री होते. ते बारामती मतदारसंघातील पुरंदरचे प्रतिनिधीत्व करायचे. मंत्री असताना हे राष्ट्रवादी काँग्रेसवर विशेषतः पवार कुटुंबीयांवर प्रचंड टीका करायचे. त्या टिकेने करारी बाण्याचे अजित पवारही व्यथित व्हायचे. त्यातूनच त्यांनी शिवतारे यांना जाहीरपणे आव्हान दिले होते. पुढच्या निवडणुकीत शिवतारे कसे निवडून येतात, ते मी बघतोच, असे आव्हान त्यांनी दिले होते आणि ते खरेही करून दाखवलं. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय जगताप यांच्यासाठी सभा घेत शिवतारे यांचा पराभव घडवून आणला. त्यामुळे शिवतारे हे पवारांवर धारदार शब्दांत टीका करत होते.

Ajit Pawar-Vijay shivtare
काय ती जळजळ...काय ती रडारड...काय ते वाकडं उभारणं : शहाजीबापूंचा भास्कर जाधवांवर निशाणा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरही शिवतारे हे राष्ट्रवादीकडून होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचायचे. पुण्यात खासदार संजय राऊत यांच्यासमोर त्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली होती. त्यावेळी त्यांना राऊतांनी सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. पण, ते संधीची वाट पाहत होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवतारे यांनी उघडपणे शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला होता.

Ajit Pawar-Vijay shivtare
मातोश्री आमचे मंदिर; तर एकनाथ शिंदे संकटमोचक : क्षीरसागरांनी साधला बॅलन्स!

दरम्यान, शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेनेचे बंडखोर आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांना पदावरून पायउतार व्हावे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. उपमुख्यमंत्री असलेल्या पवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.

Ajit Pawar-Vijay shivtare
आमचा देव मंदिरातच योग्य होता; पण... : राजेश क्षीरसागरांचे उद्धव ठाकरेंबाबत भाष्य

टोकाची टिका करणाऱ्या विजयबापूंनी अजितदादांवर विशेष प्रेम दाखवत त्यांच्या अभिनंदनाचे स्टेट्‌स आपल्या व्हॉट्‌स ॲपवर ठेवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अजितदादा पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आपल्या हातून महाराष्ट्राचं भलं व्हावं, ही सदिच्छा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. दुसरीकडे ‘अजितदादांवर कोणीही टीका करू नये, ते राज्याचे नेते आहेत, याचे भान ठेवा’ अशी सूचनाही कार्यकर्त्यांना केली आहे.

दरम्यान, अजित पवारांनी मंजुरी दिलेल्या पुणे जिल्ह्याच्या ८७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास विजय शिवतारे यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कालच स्थगिती दिली आहे, त्यामुळे त्यांचे हे प्रेम खरे किती आणि उपरोधाचे किती, हा चर्चेचा विषय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com