Shirur Politics : अजितदादांचा शिलेदार लागला कामाला; शिरुरच्या आढळरावांना मोठा दिलासा

Shivajirao Adhalrao Patil : आढळरावांनी लांडेची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कार्यालयात कार्यकर्त्यांबरोबर पुढील नियोजन केले.
Shivajirao Adhalrao Patil :
Shivajirao Adhalrao Patil : Sarakarnnama

Shirur Political News : शिरुर लोकसभा मतदारसंघात आघाडीकडून (अजित पवार राष्ट्रवादी) ऐनवेळी पक्षात आलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळरावांना उमेदवारी देण्यात आली. परिणामी येथून तीव्र इच्छुक असलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे नाराज झाले. ते शरद पवार गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र अजित पवारांनी समजूत काढण्यानंतर त्यांनी लोकसभेचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळरावांचा जीव भांड्यात पडला. Ajit Pawar Leaders Vilas Lande Start Work Of Adhalrao Patil In Shirur.

दरम्यान, आढळरावांनी Shivajirao Patil शुक्रवारी लांडेची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कार्यालयात कार्यकर्त्यांबरोबर पुढील नियोजन केले. तत्पूर्वी अजितदादांच्या आदेशानुसार लांडेंनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांचे मत विचारात घेतले. त्यानंतर आढळऱावांच्या प्रचारात उतरणार असल्याचे त्यांनी सरकारनामाला सांगितले. यामुळे भोसरीतून गेल्यावेळेप्रमाणे आढळरावांना मतांची आघाडी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मावळातील युतीचे (शिंदे शिवसेना) उमेदवार श्रीरंग बारणे Shrirang Barne यांनी उमेदवारी मिळताच भाजपचे बाळा भेगडे, शंकर जगतापांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मावळ भाजपनेच लढवावा अशी मागणी करीत बारणेंच्या उमेदवारीला चार महिने विरोध केला होता. त्यावेळी बारणेंनी अजित पवार Ajit Pawar राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांची भेट घेतली होती. त्या धर्तीवर शिरूरला आढळरावांनी ती लांडेची भेट घेतली. ते इच्छु होते, पण नाराज नाहीत, असे त्यांनी नंतर सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivajirao Adhalrao Patil :
Manoj Jarange News : बीडमध्ये ज्योती मेटे ठरणार गेमचेंजर? मनोज जरांगेंच्या भेटीत नेमकं काय ठरलं...

दरम्यान, मावळमध्ये उमेदवारीसाठी चर्चा झालेले पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची शुक्रवारी बारणे आणि आढळराव अशा दोघांनी भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. जगतापांनी खासदारकीच्या हॅटट्रिकसाठी आपल्याला शुभेच्छा दिल्या. राजकीय व्यूहरचनेवर चर्चा झाल्याचा दावा बारणेंनी नंतर प्रसिद्धीपत्रक काढून केला. मात्र,व गर्दीमुळे राजकीय चर्चा झाली नसल्याचे जगतापांनी सरकारनामाशी बोलताना स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Shivajirao Adhalrao Patil :
Madha Loksabha Constituency : महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय भूकंप ? महायुतीला धक्का; 'हा' बडा नेता तुतारी हाती घेणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com