Manoj Jarange News : बीडमध्ये ज्योती मेटे ठरणार गेमचेंजर? मनोज जरांगेंच्या भेटीत नेमकं काय ठरलं...

Beed Lok Sabha Politics : मनोज जरांगे यांनी 900 एकरांवर सभा घेण्याची घोषणा केली होती. त्याच्या नियोजनासाठी मनोज जरांगे श्री क्षेत्र नारायणगडावर आले होते.
Manoj Jarange, Jyoti Mete
Manoj Jarange, Jyoti MeteSarkarnama

Beed Political News : शरद पवार गटातून तिकिटाची अपेक्षा असलेल्या शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटेंवर मोकळ्या हाताने बीडमध्ये परतावे लागले. यावेळी त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत दिवंगत नेते विनायकराव मेटे Vinayak Mete यांच्या समाधीस्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांची आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची धावती भेट झाली. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीनिमित्त उभय नेत्यांनी भेटी झाली होती. Maratha Leaders Jyoti Mete and Manoj Jarange Meet at Beed.

मराठा आरक्षणाबाबत Maratha Reservation सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी सुरुवातीला प्रत्येक गावातून दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एक अपक्ष उमेदवार उभा करण्याचे जाहीर केले. मात्र, समाजाच्या अंतरवाली सराटीच्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय देखील मागे घेतला. मात्र, जिल्ह्यात मनोज जरांगे Manoj Jarange फॅक्टर निर्णायक ठरणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. आजही सोशल मीडियावर ‘मनोज जरांगे म्हणतील तसं’, असाच सूर आहे. त्यामुळे ज्योती मेटे आणि जरांगे पाटलांची भेट चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या व उमेदवारी टळल्यानंतरही लढणारच असल्याची घोषणा ज्योती मेटे Jyoti Mete यांनी केली आहे. त्यानंतर इफ्तार पार्टीनिमित्त योगायोगाने त्यांची आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट झालेली आहे. या भेटीत राजकीय बोलणी झाली नसली तरी दोघेही मराठा समाजासाठी काम करणारे नेते आहेत. त्यामुळे मेटे निवडणूक लढल्या तर बीडमध्ये गेमचेंजर ठरतील, असे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मनोज जरांगे यांनी 900 एकरांवर सभा घेण्याची घोषणा केली होती. त्याच्या नियोजनासाठी मनोज जरांगे श्री क्षेत्र नारायणगडावर आले होते. बैठक संपवून मनोज जरांगे जात असताना मादळमोही (ता. गेवराई) येथील इफ्तार पार्टीसाठी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून जरांगे उपस्थित होते. तर, जिल्ह्यात येणाऱ्या ज्योती मेटे यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण असल्याने त्याही तेथे पोचल्या. निवडणुकीचा मोसम असला तरी मनोज जरांगे आणि ज्योती मेटे या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने का होईना झालेली भेट राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange, Jyoti Mete
Baramati Politics : हर्षवर्धन पाटलांचा अजितदादांवर भरोसा नाय का? थेट फडणवीसांनाच घातलं साकडं, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com