Vishwajeet Kadam on Rahul Gandhi : '...म्हणून राहुल गांधी येत आहेत सांगलीत', विश्वजीत कदमांनी सांगितलं कारण!

Mahavikas Aghadi News : ...त्याच ठिकाणाहूनच महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुगणार असल्याचं बोललं जात आहे.
Vishwajit Kadam
Vishwajit KadamSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi Sangli Tour : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते काँग्रसचे दिवंगत ज्येष्ठ नेते, डॉ पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण 5 सप्टेंबर रोजी सोनसळ येथे होणार आहे. यानंतर कडेगाव येथे महाविकास आघाडीचा मोठा मेळावा संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी(Rahul gandhi), राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व मोठे नेते उपस्थित असणार आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडी कडून ज्या सांगली लोकसभेच्या जागेवरून आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता, त्याच ठिकाणाहूनच महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जात आहे.

Vishwajit Kadam
VIDEO : शरद पवारांशी चर्चा, तुतारी हाती घेणार? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं

या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. विश्वजीत कदम(Vishwajeet Kadam) म्हणाले, मला समाधान आणि आनंद व्यक्त करायचा आहे की देशाच्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि विरोधी पक्षनेते बनल्यानंतर राहुल गांधींचा हा पहिला महाराष्ट्र दौरा आहे.

या दौऱ्याच्या निमित्ताने ते माझ्या पलूस कडेगाव या विधानसभा मतदारसंघांमध्ये येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र मधील काँग्रेसचा परफॉर्मन्स हा देशातील इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक राहिला आहे. म्हणजेच महाराष्ट्राचे योगदान हे काँग्रेसच्या आकड्यांमध्ये हायेस्ट राहिला आहे. काँग्रेसचा(Congress) आकडा 99 वरून 100 करण्याचे काम सांगलीच्या मातीने केले आहे. म्हणून राहुल गांधी या ठिकाणी येत असून मी त्यांचे धन्यवाद मानत असल्याचं विश्वजीत कदम यांनी सांगितले.

लोकसभेला ज्याप्रमाणे सांगली पॅटर्न महाराष्ट्रात पाहायला मिळाला त्याचप्रमाणे विधानसभेला देखील असाच पॅटर्न पाहायला मिळेल का? प्रश्नाला उत्तर देताना विश्वजीत कदम म्हणाले, सांगली लोकसभा मतदार संघामधील त्या वेळेची परिस्थिती वेगळी होती. सांगलीच्या लोकांना जे वाटलं ते त्यांनी केलं आहे. आता तो विषय संपला असल्याचं स्पष्टीकरण विश्वजीत कदम यांनी दिलं.

Vishwajit Kadam
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : पुतळ्याच्या मुद्द्यावरुन कुणी काढली पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची नियत

मंत्री दीपक केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर टीका करताना कदम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारमधील एखादा मंत्री जर म्हणत असेल की यातून काहीतरी चांगलं घडेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता त्यांचं काय घडेल हे दाखवून देईल असं कदम म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com