alleging BJP voter list manipulation citing CCTV footage.
alleging BJP voter list manipulation citing CCTV footage.sarkarnama

Voter List Controversy : महापालिका भाजपात विलीन? बंद खोलीतील 'त्या' सीसीटीव्हीवरून विश्वंभर चौधरी संतापले

BJP CCTV Congress Sanjay Balgude : काँग्रेस नेते संजय बालगुडे यांनी पुणे पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत भाजप कार्यकर्ते चार तास बसून मतदारयाद्यांमध्ये फेरफार करत असल्याचा सीसीटिव्ही समोर आणला आहे.
Published on

Pune News : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदारयाद्या तयार करण्याचे कामात भाजप फेरफार करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते संजय बालगुडे यांनी थेट सीसीटिव्ही दाखवत हा आरोप केला आहे.

संजय बालगुडे म्हणाले, 'भवानी पेठ इथल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत भाजप कार्यकर्ते चार तास बसून होते. जे अधिकारी बसून वेगवेगळ्या प्रभागाच्या याद्या करत आहेत. त्यामध्ये क्लिअर आवाज यतोय हा भाजपचा वाॅर्ड आहे येथे काही करण्याची गरज नाही.'

सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, 'मनपाचा सीसीटीव्ही सगळं रेकाॅर्ड करत आहे पण सत्तेच्या धुंदीतले धुंदीतच आहेत.तब्बल साडे चार तासाचं कडीबंद रेकाॅर्डिंग आहे आपल्याकडे. आम्ही सगळे मनपात जातो. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज आणि संबंधित खात्याचे काटकर नावाचे अधिकारी यांना याचं गांभीर्य समजावून सांगतो.आयुक्त साहेब कार्यक्रमांसाठी बाहेर असतात. आयुक्तांनी महापालिका भाजपात विलीन केली आहे का"? असा प्रश्न विचारतो.'

.

पुण्याच्या मतदार याद्या अद्याप गोपनीय आहेत. त्या लोकांसाठी 20 नोव्हेंबरला म्हणजे अजून वीस दिवसांनी ओपन होणार आहेत. 27 पर्यंत लोक हरकत घेऊ शकतात.पण लोकशाहीपेक्षा मोठे असलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हातात त्या याद्या आहेत.

कडी बंद करून आत मस्त गुऱ्हाळ चालू आहे.आयुक्तांनी स्वतः सांगितलं होतं की याद्या प्रकाशित होत नाहीत तोवर त्या याद्या सरकारी गोपनीय दस्तावेज आहेत. मग ते भाजपाच्या लोकांना कसे मिळाले? असा सवाल देखील चौधरींनी उपस्थित केला

alleging BJP voter list manipulation citing CCTV footage.
Sheetal Tejwani : शितल तेजवानीचा नवा 'कारनामा', रणबीर कपूरविरुद्ध ठोकला 50 लाखांच्या नुकसान भरपाईचा दावा; नेमकं काय आहे प्रकरण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com