Pune University : 'व्हॉईस ऑफ देवेंद्र' विरोधात आवाज वाढताच पुणे विद्यापीठ नरमलं : वादग्रस्त वक्तृत्व स्पर्धा रद्द

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 'Voice of Devendra' असा वादग्रस्त विषय असलेल्या वक्तृत्व स्पर्धेचं परिपत्रक मागे घेतले.
Pune University withdraws ‘Voice of Devendra’ contest circular; student protests continue on campus.
Pune University withdraws ‘Voice of Devendra’ contest circular; student protests continue on campus. Sarkarnama
Published on
Updated on

Pune University : अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 'Voice of Devendra' असा वादग्रस्त विषय असलेल्या वक्तृत्व स्पर्धेचं परिपत्रक मागे घेतलं आहे. NSUI आणि इतर विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनानंतर पुणे विद्यापीठाने हे परिपत्रक मागे घेत असल्याचे जाहीर केले. यानंतरही विद्यापीठाकडून राजकीय व्यक्तीपूजा सुरु आहे, असा विषय घेतलाच का? याबाबत सविस्तर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करत अद्यापही विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरु आहे.

उपक्रम नेमका काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून पुणे विद्यापीठाने 'व्हॉईस ऑफ देवेंद्र' ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. तरुणांना 'विकसित महाराष्ट्र'च्या दृष्टीकोनाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्व, वक्तृत्व कौशल्यांना विकसित करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे विद्यापीठाने म्हंटले होते.

ही स्पर्धा महाराष्ट्रातील 14 ते 25 वयोगटातील तरुण तरुणींसाठी खुली होती. स्पर्धेचा मुख्य विषय 'विकसित महाराष्ट्र' हा आहे. तसंच स्पर्धा विविध टप्प्यात विभागलेली होती. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील सर्व NSS च्या स्वयंसेवकांना या स्पर्धेबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्यासाठी सूचित करण्यात यावं, असं यासंदर्भातील निवेदनात म्हटलं होतं.

पण या स्पर्धेवर टीका करत काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या उपक्रमावर आक्षेप घेत ट्विटद्वारे विद्यापीठाला खडे बोल सुनावले होते.

विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो. निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंटप्रमाणे काम करत असल्याचं संपूर्ण देश बघत आहे.

आता शिक्षणाची मंदिरं असलेली विद्यापीठं देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा? विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच Voice of Democracy मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील, असे रोहित पवार म्हणाले होते.

याविरोधात तीव्र आंदोलन आणि प्रतिक्रिया आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत या वक्तृत्व स्पर्धेचं परिपत्रक मागे घेतलं. यानंतरही विद्यापीठाकडून राजकीय व्यक्तीपूजा सुरु आहे, असा विषय घेतलाच का? याबाबत सविस्तर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करत अद्यापही विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com