Walmik Karad Update: 'मास्टरमाईंड' वाल्मिक कराडबाबत CID अन् बीड पोलिसांंना मिळाली 'ही' मोठी अपडेट; तपासाला वेग

Santosh Deshmukh Murder Case Investigation : सध्या या प्रकरणाचा सीआयडीकडून कसून तपास सुरू आहे. तर बीड पोलीसही या प्रकरणी अॅक्शन मोडवर आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याच कराडबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
Walmik Karad
Walmik Karad Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला आता जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळ उलटला आहे. तरीही या घटनेतील सर्व आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिस तसेच सीआयडी अद्याप यश आलेलं नाही. यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. अशातच आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) हा महाराष्ट्रातच असल्याची मोठी माहिती येत आहे.

सध्या या प्रकरणाचा सीआयडीकडून कसून तपास सुरू आहे. तर बीड पोलीसही या प्रकरणी अॅक्शन मोडवर आहेत. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याच कराडबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

सीआयडीची 9 पथके आणि बीड पोलिस यांच्यासह 150 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी या घटनेच्या तपास सुरू आहे. या घटनेत आत्तापर्यंत राम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे अजूनही फरार आहेत. तर 2 कोटीच्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड फरार आहेत. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाईंड वाल्मिक कराडच असल्याचा आरोप देशमुख कुटुंब आणि विरोधकांकडून केला जात आहे.

Walmik Karad
Santosh Deshmukh Case : CID च्या 9 पथकांसह 150 हून अधिक पोलिसांकडून शोधाशोध, तरीही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी मोकाटच

या वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी सीआयडीचे विशेष पथकं रवाना झाले आहेत. त्यातच आता कराड हा महाराष्ट्रातच असल्याची माहिती समोर येत आहे. सीआयडीच्या अजून 4 टीम कराडला अटक करण्यासाठी वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच कराड पोलिसांना हाताला लागण्याची शक्यता आहे.

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी (ता.30) सीआयडीच्या अधीक्षकांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी ज्योती जाधव ही कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा खळबळजनक दावा केला होता. तसेच त्यांचीही बीड पोलिस आणि सीआयडीच्या पथकाकडून चौकशी सुरु असल्याचं धनंजय देशमुख यांनी केला होता.

Walmik Karad
Sanjay Raut News : 'तो' फोटो! खासदार राऊतांचे सूचक ट्विट; व्वा! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा 'आका'?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. त्याप्रमाणे सीआयडीकडून जप्ती सुरु करण्यात आली आहे. यात वाल्मिक कराडची 100 हून अधिक बँक खाती गोठवली गेली आहे. या संदर्भातलं पत्रही सीआयडीकडून उच्च न्यायालयात दिले गेले आहे.

बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरण व तुळजापूर तालुक्यातील सरपंचावर झालेला हल्ला त्यासोबतच राज्यात सतत सरपंचावर होणाऱ्या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने निषेध केला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यासाठी सात जानेवारीपर्यंतची डेडलाईन दिली आहे.

Walmik Karad
Suresh Dhas On Prajakta Mali: धसांचं एक पाऊल मागं; प्राजक्ता माळीविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी; म्हणाले,'मी ग्रामीण भागातला...'

तोपर्यंत राज्य सरकारने जर ठोस निर्णय घेतला नाही तर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच मुंबईत धरणे आंदोलन करणार आहेत, असा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषदेने घेतला असल्याचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सांगितले. या सगळ्या घडामोडींनंतर सरकार आणि सीआयडी, पोलिस यंत्रणांवरचा दबाव दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com