Ranjan Taware : ‘माळेगाव’ची मागील निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे हरलो होतो; आता खबरदारी घेतलीय, रंजन तावरेंनी सांगितले मागील पराभवाचे कारण

Malegaon Sugar Factory Election : पवारांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे. पण शेतकरी आणि सभासदांच्या प्रपंचाची ही निवडणूक आहे. त्यांच्या मुला बाळाचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे.
Ranjan Taware-Ajit Pawar
Ranjan Taware-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Malegaon, 17 June : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला आरोप-प्रत्यारोपांमुळे मोठी रंगत येताना दिसत आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पारंपरिक विरोधक तावरे यांच्यातील राजकीय सामना दिवसेंदिवस धारदार होताना दिसत आहे. अजितदादांच्या प्रत्येक आरोपाला तावरे यांच्याकडून सडेतोड उत्तर दिले जात आहे. ‘आम्ही सहकाराचे पुरस्कर्ते आहोत, असे खासगी कारखानदारांनी स्वतःला कितीही म्हणवून घेतले तरी सभासद त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. अजित पवारांच्या प्रचारातील व्यूहरचना आम्ही हाणून पाडणार, असा इशारा सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख रंजन तावरेंनी दिला. मागील निवडणुकीत आम्ही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे हरलो होतो, आता त्याची पूर्णतः खबरदारी घेतली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी (ता. १६ जून) विरोधक चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याला रंजन तावरे यांनी कुरणेवाडी येथील सभेत जोरदार उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी गेली ४५ वर्षांत सहकारातून माळेगावच्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टीने समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे फळ सभासद शेतकरी नक्की देतील.

चंद्रराव तावरेंच्या दूरदृष्टीमुळे माळेगाव साखर कारखान्याचा सर्वांगिण विकास झाला आहे. विस्तारीकरण, डिस्टिलरी व विजनिर्मिती प्रकल्प, शिवतीर्थ मंगल कार्यालय, शिक्षण संस्था उभारण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. पवार कुटुंबीयांना गेल्या ५० वर्षांपासून बारामतीकरांनी लोकसभा, विधानसभा यासह सर्व काही दिले, तरीही त्यांना माळेगाव कारखाना पाहिजे. हे सभासद कदापीही खपवून घेणार नाहीत, त्याचा सभासदांच्या बोलण्यातून त्याचा येत आहे, रंजन तावरे यांनी सांगितले.

पवारांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे. पण शेतकरी आणि सभासदांच्या प्रपंचाची ही निवडणूक आहे. त्यांच्या मुला बाळाचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. महासत्तेशी लढताना सर्व सभासदांनी एकजुटीने लढणे गरजेचे आहे, असे आवाहन रंजन तावरेंनी केले.

Ranjan Taware-Ajit Pawar
Sharad Pawar Politic's : आता खुद्द पवारसाहेबांनी सांगितले तरी राष्ट्रवादीत थांबणार नाही : निष्ठावंत सहकारी प्रचंड आक्रमक

सत्ताधाऱ्यांच्या हातात माळेगाव सहकारी साखर कारखाना पुन्हा गेला, तर शेजारची ११ गावे पुन्हा जोडण्याची ही मंडळी घाट घालतील, त्यामुळेच आम्ही सभासदांना सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहन करत आहोत, असेही तावरेंनी स्पष्ट केले.

Ranjan Taware-Ajit Pawar
Jayant Patil : करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटील यांच्यापेक्षा माध्यमांना अतिघाई; भाजप प्रवेशाच्या चर्चांचे नेमकं कारण काय?

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चंद्रराव तावरे यांच्या भोवती फिरत आहे. तोच फॅक्टरच या निवडणुकीत चालणार आहे. चंद्रराव तावरेंवर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा विश्वास आहे, त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार बचाव शेतकरी पॅनेल निवडून येणार आहे, असा दावा माळेगाव कारखान्याचे विरोधी संचालक ॲड. जी. बी. गावडे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com