‘आम्ही अजितदादांना भेटलो; पण...’ : भाजप नेते दादा पाटील फराटेंचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीत प्रवेशास इच्छूक असणाऱ्यांची नावे पवारांनी जाहीर करावीत.
Dada Patil Farate-Ajit Pawar
Dada Patil Farate-Ajit PawarSarkarnama

शिरूर (जि. पुणे) : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी कारखान्याची निवडणूक (Sugar Factory Election) लढविताना आम्ही आमची शेतकरी हिताची भूमिका घेऊन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटलो होतो. निवडणुकीनंतर अजितदादांना भेटलेलो नाही आणि कारखान्याच्या मुद्द्यासंदर्भात भेटलो म्हणून लगेच राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याच्या वावड्या आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी जबाबदार व्यक्तीने उठविणे चुकीचे आहे. राष्ट्रवादीत प्रवेशास इच्छूक असणाऱ्यांची नावे पवारांनी जाहीर करावीत, असे आव्हान घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक आणि भाजपचे (BJP) नेते दादा पाटील फराटे (Dada Patil Farate) यांनी आमदार पवारांना दिले. (We meet Ajit Pawar taking the role of farmers' interest : Dada Patil Farate)

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर काखान्याच्या निवडणुकीनंतर भाजपकडून फराटे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तत्पूर्वी आमदार अशोक पवार यांनी विरोधकांमधील काहीजण अजित पवारांना भेटले आहेत, असे विधान केले होते. त्याला दादा पाटील फराटे यांनी उत्तर दिले.

Dada Patil Farate-Ajit Pawar
मोहोळ तालुका सोडला, तर तुम्हाला कोण ओळखतो? : उमेश पाटलांचा राजन पाटलांना रोखठोक सवाल

दादा पाटील फराटे म्हणाले की, आम्ही शेतकरी हिताच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भेटलो, त्याच पद्धतीने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह सर्वच पक्षांच्या छोट्या-मोठ्या नेत्यांना भेटलो. पण, कारखान्याच्या निवडणुकीनंतर मी अजितदादांना भेटलेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dada Patil Farate-Ajit Pawar
राजन पाटलांचे चॅलेंज उमेश पाटलांनी स्वीकारले : ‘तुम्ही स्वतः माझ्या विरोधात निवडणूक लढवा...’

अशोक पवारांनी त्यांचे कार्यकर्ते सांभाळावेत : सोनवणे

दरम्यान, भाजपचे शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी आमदार अशोक पवार यांनाच उलट चॅलेंज दिले आहे. भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार नाही. कुणी तसे सांगत असेल, तर ते तालुक्यातील जनतेचे स्वप्नरंजन करीत आहेत. याउलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी लडीतील फटाके जसे फुटत जातात, तशी राष्ट्रवादी फुटणार आहे. फटाक्याच्या लडीसारखी भाजपमध्ये रांग लागणार आहे. त्यामुळे आमच्यातील कुणी राष्ट्रवादीत जाणार आहे, असे सांगणाऱ्यांनी त्यांचे कार्यकर्ते सांभाळावेत, असे आवाहनही सोनवणे यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com