'आमची एक चाल चुकली आणि...' : फडणवीसांनी सांगितले २०१९ च्या पराभवाचे कारण

Devendra Fadanvis| Sunil Kedar| बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे राजकारणातही डोळ्यात अंजन घालून सतर्क राहावे लागते
Devendra Fadanvis| Sunil Kedar
Devendra Fadanvis| Sunil KedarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार (Sunil kedar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत मंगळवारी (31 मे) पुण्यातील बालेवाडीमध्ये बुद्धीबळ स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शाब्दिक चिमटे काढले. (Devendra Fadanvis Latest news in Pune)

स्पर्धेतील बुद्धिबळ खेळाचे उद्घाटन करताना देवेंद्र फडणवीस यांनी खेळाची पहिली चाल खेळावी अशीच सगळ्यांची इच्छा होती. पण नियमानुसार, बुद्धिबळात आधी पांढऱ्या सोंगट्याकडून पहिली चाल खेळली जाते, हे लक्षात आलं आणि केदार यांनी आपली पहिली चाल खेळली. त्यानंतर फडणवीस यांनीदेखील आपली चाल खेळली.

Devendra Fadanvis| Sunil Kedar
कॉंग्रेसला संपवण्यासाठी शिवसेनेने पद्धतशीरपणे प्लॅन आखलाय; महाविकास आघाडीत धुसफुस कायम

स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, 'बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे राजकारणातही डोळ्यात अंजन घालून सतर्क राहावे लागते. एक जरी चाल चुकली तरी पराभव निश्चित असतो. आम्हीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अशाच एका चुकीमुळे पराभूत झालो. पण तुम्ही तशा चुका करू नका', असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी विधानसभा काळातील सत्तासंघर्षाच्या आठवणीला उजाळा दिला.

याचवेळी महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनीही जोरदार निशाणा साधला. बुद्धिबळाच्या खेळात तुमच्या क्षमतेची कसोटी लागते. समोरच्या खेळाडूच्या कौशल्याचाही नीट अभ्यास करणे महत्त्वाचे असते. हीच गोष्ट तुम्हाला खेळाच्या स्पर्धेत आणि प्रत्यक्ष आयुष्यातही तुम्हाला उपयोगी पडत असते.२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत म्ही असा अभ्यास केला आणि विजयी झालो. हीच परंपरा यापुढेही कायम राहील' असा खोचक टोलाही मंत्री सुनील केदार यांनी लगावला.

तर, दूसरीकडे पिंपरी चिंचवडमध्येही आमदार चषक २०२२ या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा देवेंद्र फडणवीस यांच्या शुभारंभ पार पडला. 'खेळामध्ये हार-जीत महत्वाची नसते, महत्वाचे असते ती तुमची खिळाडू वृत्ती. हरल्यानंतर आणि जिंकल्यानंतर ज्यांची खिळाडूवृत्ती जिवंत राहते, ते हरल्याने खचत नाहीत आणि त्यांना जिंकण्याता गर्वही राहत नाही. हरल्यानंतर जीवनात पराभव पचवता आला पाहिजे आणि जिंकल्यानंतर नम्रता टिकवता आली पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंना आणि उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com