पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुण्यात आंदोलन करताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा ‘व्हीडीओ’ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर देश आणि राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पुण्यात आंदोलने सुरू झालीत. या साऱ्या घडामोडी घडत असताना पोलिसांची (Pune Police) पंचाईत झाली आहे. यावर उपाय म्हणून आता हा ‘व्हीडीओ’ची न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून (फॉरेन्सिक लॅब) तपासणी झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांच्या दाव्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्याशी काल (२५ सप्टें ) माध्यम प्रतिनिधिंनी संपर्क साधला असता, पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. अशा प्रकारच्या अफवाही कोणी पसरवू नयेत, असं आवाहन देखील पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले होते. मात्र आता "पाकिस्तान जिंदाबाद" घोषणांचा समाजमाध्यमांवरील व्हायरल व्हिडीओ फॉरेंसिक लॅबकडे पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
समाजमाध्यमांत काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जे काही व्हिडिओ उपलब्ध होतील, ते एकत्र करणार असून फॉरेंसिक लॅबकडे पाठवून त्याची सत्यता पडताळून पाहणार आहोत, असे सागर पाटील म्हणाले. संबधित आंदोलन बंडगार्डन पोलिस ठाण्यात केले गेले होते. त्यामुळे या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओचा आता तपास करण्यात येणार आहे. पुढील तपासात ज्या गोष्टी समोर येतील, त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे सागर पाटील म्हणाले.
पोलिसांनी याप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांचा उल्लेख करण्यात आला आहे. भाजप मुर्दाबाद, एनआयए मुर्दाबाद, मासूमो को रिहा करो, अशा विविध घोषणांचा यात उल्लेख आहे. मात्र एफआयआरमध्ये पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा पोलिसांनी उल्लेख कलेला नाही.
यामुळे आता पुणे पोलिस संभ्रम अवस्थेत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पॉप्युलर फ्रंट इंडियाने केलेल्या आंदोलनाच्या दिवशी पोलिसांनी "पाकिस्तान जिंदाबादच्या" घोषणा दिल्या नसल्याचे ठामपणे सांगितले होते. मात्र आता पुणे पोलिसांकडून समाजमाध्यमांवरील व्हायरल व्हिडीओ फॉरेंसिक लॅबकडे पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दोनच दिवसातील पोलिसांच्या या वेगवेगळ्या भूमिकेमुळे आता यावर जोरदार चर्चा होत आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.