Sharad Pawar News : महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शरद पवार विजयाचा कोणता 'गुरूमंत्र' देणार ?

Political News : आघाडीचा 24 फेब्रुवारीला मेळावा
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मेळावा येत्या शनिवारी (24 फेब्रुवारीला) होणार आहे. काँग्रेस भवन येथे होणाऱ्या या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन्ही पक्षात गेल्या काही महिन्यांपूर्वी फूट पडली. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना हाताशी धरत हे पक्ष फोडले असल्याचा आरोप केला जात आहे.

शिवसेनेत बंड करून आपला वेगळा गट करत उद्धव ठाकरे यांच्या सत्तेतून बाहेर पडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना ताकद देत भाजपने त्यांना मुख्यमंत्री केले. तर सात महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन बाहेर पडत शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा दिलेल्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले.

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Parbhani Political News : हायकमांडच पक्षात टिकेना, पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जायचं तरी कुठे?

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच विकास करू शकतात. देश विकासाच्या मार्गावर नेऊ शकतात, असा दावा भाजपकडून केला जात असून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत 'अबकी बार 400 पार' अशी घोषणा भाजपने केली आहे. त्याला पाठींबा दाखवित राज्यात सत्तेत सहभागी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या गटातील आमदार, खासदारांनी तिसऱ्यांदा मोदी यांनाच पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही भाजपने आपल्या गळाला लावले असून काँग्रेसमधून आलेल्या चव्हाण यांना थेट राज्यसभेची बक्षिसी देखील देण्यात आली आहे.

पुढील काही दिवसांत काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये असतील, असे वक्तव्य करत भाजपचे वरिष्ठ नेते खळबळ देखील उडवून देत आहेत. भाजपच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली असून वाढती महागाई, गगनाला भिडलेले इंधनाचे दर, वाढती बेरोजगारी, याबरोबरच केंद्र सरकारच्या यंत्रणांचा चुकीचा वापर या विरोधात आवाज उठवून भाजपला पराभूत करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जागेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजय कसा मिळवता येईल, त्यासाठी काय केले पाहिजे. याबाबत महाविकास आघाडीचे नेते या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. कार्यकर्त्यांना या मेळाव्यातून कोणते मार्गदर्शन मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), चंद्रकांत हंडोरे (Chandraknt handore), डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. बाबा आढाव हे देखील या मेळाव्यासाठी हजर राहणार आहेत.

इच्छुक उमेदवार करणार शक्तिप्रदर्शन

महाविकास आघाडीत समाज असलेल्या पक्षांबरोबरच आम आदमी पार्टी, जनता दल या घटक पक्षाचे कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसतर्फे 20 जणांनी अर्ज भरले आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने आपली ताकद दाखवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Sharad Pawar : शरद पवार गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठी अपडेट; दिली 'ही' माहिती

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com