Vijay Mane| डुप्लिकेट एकनाथ शिंदे प्रकरणात आता पुणे पोलीस काय करणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखीच वेशभूषा, दाढी आणि कपडे परिधान केल्याने विजय माने गेल्या महिन्यात चांगलेच चर्चेत आले होते.
Vijay Mane
Vijay Mane
Published on: 
Updated on: 

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांच्यासारखा हुबेहुब दिसणा-या विजय मानेनं हायकोर्टात  (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. आपल्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत विजय मानेंनी आपल्या याचिकेत केली होती. आता न्यायालयाने पुणे पोलिसांनाच नोटीस बजावली आहे.

या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली असून न्यायालयाने पुणे पोलिसांना नोटीस बजावली आहे. येत्या 18 ऑक्टोबरपर्यंत पुणे पोलिसांनी आपलं उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती मोडक यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने निर्देश दिले.

Vijay Mane
मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात जाणार? शिंदे गटातील मंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखीच वेशभूषा, दाढी आणि कपडे परिधान केल्याने विजय माने गेल्या महिन्यात चांगलेच चर्चेत आले होते. पण मुख्यमंत्र्यांच्या वेशात फिरणाऱ्या विजय मानेंना फोटो सराईत गुन्हेगारासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला. बंडगार्डन पोलिसांनाही याची माहिती मिळाली. खंडणी विरोधी पथकाच्या पेट्रोलिंग करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी सोशल मिडीयाद्वारे माहिती घेतल्यानंतर पोलिसांना एक फोटो मिळाला. या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचं दिसत आहे.

याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांचं रूपात फसवणूकीच्या आरोपात विजय मानेंविरोधात पुणे पोलिसांनी फसवणूक, बदनामी, अब्रुनुकसानी यां कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका विजय मानेंनी अॅड. असिम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली. या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने आता पुणे पोलिसांनाच नोटीस बजावली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारखा हुबेहुब दाढी मिश्या, पांढरी कपडे असा पेहराव करुन विजय माने हे मुख्यमंत्र्यांसारखा पेहराव करुन वावरायचे. अनेक कार्यक्रमांमध्येही त्यांना आमंत्रणं मिळ होती. गणपतीच्या उत्सवात त्यांचा डान्स करतानाचे व्हिडीओ चांगला व्हायरल झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.