Chhatrapati Sugar Factory : 'छत्रपती'च्या निवडणुकीचा बिगुल केव्हा वाजणार ? विद्यमान संचालक मंडळाला सव्वातीन वर्षांच्या मुदतवाढीचा 'जॅकपॉट'

Indapur Political News : छत्रपती सहकारी साखर कारखान्याची यापूर्वीची पंचवार्षिक निवडणूक २०१५ मध्ये झाली होती.
Sugar Factory Election
Shree chhatrapati sahakari Sakhar karkhana
Sugar Factory Election Shree chhatrapati sahakari Sakhar karkhanaSarkarnama

Walchandnagar: इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची यापूर्वीची पंचवार्षिक निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. मात्र, गेल्या सव्वा तीन वर्षांपासून या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रखडली असून विद्यमान संचालक मंडळाला सव्वा तीन वर्षे अतिरिक्त पदावरती काम करण्याची संधी मिळाली आहे.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी क्षेत्रातील निवडणुका प्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. उच्च न्यायालयामध्ये(High Court) 'तारीख पे तारीख' सुरु होती. निवडणूका पुढे जात असल्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने २१ एप्रिल २०२३ रोजी प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा जिल्हा निवडणूक प्राधिकरणाला आदेश देवून चार आठवड्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिला होता.

Sugar Factory Election
Shree chhatrapati sahakari Sakhar karkhana
Sangram Jagtap News : अजित पवार गटाच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'मराठा आरक्षण मिळाले नाही, तर...'

जिल्हा निवडणूक प्राधिकरणाने १२ जुलै २०२३ रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करुन २० जुलैपर्यंत हरकती मागवून २ ऑगस्ट अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. जाचक यांच्यासह अनेकांनी हरकती घेतल्या होत्या. मात्र जाचक यांच्या हरकती फेटाळून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी २ ऑगस्ट रोजी २३ हजार ३१ सभासदांची अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध केली.

मात्र, कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक(Prithviraj Jachak) यांनी पुन्हा मतदार यादीवरती हरकत घेवून उच्च न्यायालयामध्ये दुसऱ्यांदा याचिका दाखल केली होती. दरम्यानच्या काळामध्ये ७ जून रोजी रोजी सरकारने अक्रियाशील,क्रियाशील सभासदांसाठी नवीन अध्यादेश काढला होता.

राज्य सरकारने २१ ऑगस्ट २०२३ रोजी नव्याने अध्यादेश काढून क्रियाशिल व अक्रियाशिल सभासदांची वर्गीकरण काढले आहे. उच्च न्यायालयाने ७ सप्टेंबर २०२३ नव्याने मतदारयादी तयार करण्याचा आदेश आहे. उच्च न्यायालयातील याचिका,कोराना,लॉकडाउन कारखान्याच्या संचालक मंडळाला सव्वातीन वर्षाची मुदतवाढ मिळाली असून निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (Latest Marathi News)

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची यापूर्वीची पंचवार्षिक निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. ११ मे २०२० रोजी कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. यापूर्वी ३१ डिसेंबर २०१९ कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. व २३ जानेवारी २०२० रोजी २४ हजार ६९९ मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती.

Sugar Factory Election
Shree chhatrapati sahakari Sakhar karkhana
INDIA Alliance Meeting : 'इंडिया आघाडी'च्या बैठकीत मोठा निर्णय; भाजपविरोधात देशभरात जाहीर सभा घेण्यात येणार

कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी २०२० मध्ये मात्र, अक्रियाशिल तसेच कारखान्याला सलग तीन वर्षे कारखान्याला उस पुरवठा न करणाऱ्या व थकबाकीदार सभासदांना मतदानाचा अधिकार देण्यात येवू नये यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असताना देशामध्ये कोरोना प्रार्दुभाव वाढल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला.

प्रारुप यादी लवकरच प्रसिद्ध होणार

छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीसाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०१९ व १२ जुलै २०२३ रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सध्या निवडणूकीच्या प्रक्रिया सुरु झाली असून तिसऱ्यांदा कारखान्याच्या सभासदांची प्रारुप यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

Sugar Factory Election
Shree chhatrapati sahakari Sakhar karkhana
Amravati Political News : अमरावतीत राजकारण तापलं ; आमदार रवी राणा - ठाकरे गटातला वाद चिघळला; 'या' नेत्याचा पुतळा जाळला

बारामती, इंदापूर तालुक्यात छत्रपती कारखाना महत्त्वाचा

नीरा खोऱ्या पट्यातील छत्रपती,माळेगाव व सोमेश्‍वर हे तीन महत्वाचे साखर कारखाने आहेत. तिन्ही साखर कारखान्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे वर्चस्व आहे. छत्रपती कारखान्याचे कार्यक्षेत्र बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये असून राजकीयदृष्ट्या छत्रपती कारखाना महत्वाचा समजला जात असल्याने कारखान्याचे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sugar Factory Election
Shree chhatrapati sahakari Sakhar karkhana
Karad News : कराडमधील जनजीवन पूर्वपदावर; दक्षतेसाठी पोलिस बंदोबस्त कायम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com