Amravati Political News : अमरावतीत राजकारण तापलं ; आमदार रवी राणा - ठाकरे गटातला वाद चिघळला; 'या' नेत्याचा पुतळा जाळला

Rana Family Vs Thackeray Group : अपक्ष आमदार रवी राणा आणि ठाकरे गट यांच्यात सुरू झालेला राजकीय वाद दिवसेंदिवस वाढतच आहे.
Ravi Rana Uddhav Thackeray
Ravi Rana Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Amravati : युवा स्वाभिमान पक्षाचे नेते, बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी वाद आहेत. अलिकडेच खासदार राणा यांनी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्यावरही टीका केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठणाचे निमित्त पुढे करत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले होते. तेव्हापासून राणा विरुद्ध ठाकरे गटातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आरोप-प्रत्यारोपांपासून सुरू झालेला हा वादाचा आता भडका उडाला आहे. ठाकरे गटाने आमदार राणांचा पुतळा जाळला आहे.

Ravi Rana Uddhav Thackeray
Yashomati Thakur News: यशोमती ठाकूर-राणा यांच्यातील वाद पुन्हा भडकणार? ठाकूर म्हणाल्या, "खोटे जात प्रमाणपत्र..."

अपक्ष आमदार रवी राणा(Ravi Rana) आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेला राजकीय वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. या राजकीय वादातून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्राणघातक चाकू हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा तक्रार आमदार राणा यांनी पोलिसांत दिली आहे. तर आमदार राणा यांनी ठाकरे यांच्याविरुद्ध अपशब्द वापरत पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रत्यारोप होत आहे. अशातच राणा विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वाद आणखी वाढला आहे.

अंजनगावसुर्जी पोलिसांनी याप्रकरणी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने ठाकरे गट संतप्त झाला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे आमदार रवी राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. काँग्रेस आणि आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत आमदार राणा यांचा पुतळा पेटवून दिला. यावेळी आमदार राणा यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून राणा कायद्याचा दुरूपयोग करत असल्याची टीका आंदोलकांनी यावेळी केली.

दहीहंडीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अवलोकन करत असलेल्या आमदार राणा यांच्यावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर राणा समर्थक व हल्लेखोरांमध्ये हाणामारीही झाली. आमदार राणा यांनी विनाकारण उद्धव ठाकरे व आमदार वानखेडे यांच्यावर जहरी टीका केली.

त्यामुळे काही कार्यकर्ते त्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र, युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच त्यांना मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले असा प्रत्यारोप ठाकरे गटाने केला आहे. राणा विरुद्ध ठाकरे यांच्या या वादाचे पडसाद आता अमरावती जिल्ह्यात उमटत आहेत.

Ravi Rana Uddhav Thackeray
CM Eknath Shinde Tour At Jalna : भुमरे- खोतकरही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून अनभिज्ञ..

राजकीय कारणांमुळे आमदार राणा यांचे अमरावती जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी वाद आहेत. माजी खासदार आनंदराव अडसूळ, त्यांचे सुपुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ, आमदार सुलभा खोडके, आमदार बच्चू कडू ही त्यापैकी काही प्रमुख नावे आहेत. अलिकडेच खासदार नवनीत राणा यांनी आमदार अॅड. यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांच्यावरही टीका केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Ravi Rana Uddhav Thackeray
Eknath Shinde - Jarange Patil : मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी 'प्लॅन' बदलला ? जरागेंची भेट घेण्यासाठी आता शिंदे नाही, तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com