Ravindra Dhangekar Warning : ...म्हणून जिथे चंद्रकांतदादा जाणार, तिथे आंदोलन करणार : धंगेकरांचा थेट इशारा

Kasaba Vidhansabha : या निधीसाठी आम्ही पाठपुरावा केला. तो निधी टेंडर प्रक्रियेला आल्यानंतर महापालिका आयुक्तांची आम्ही मान्यता घेतली.
Ravindra Dhangekar Warning
Ravindra Dhangekar Warning Sarkarnama
Published on
Updated on

Pune Politics : पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने कसबा विधानसभा मतदार संघाच्या विकास कामांसाठी मंजूर केलेला निधी अचानक पर्वती मतदार संघासाठी वळवण्यात आला. विरोधी पक्षातील असल्याने सत्ताधारी कुरघोडीचं राजकारण करत आहेत. कसब्यासाठी मंजूर झालेला निधी ऐनवेळी दुसऱ्या मतदारसंघाला देणे हे अन्यायकारक आहे. असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच, सत्ताधारी पक्षातील नेते कुरघोडीच राजकारण करत आहेत. त्यामुळे आजपासून जिथे जिथे चंद्रकांत पाटील असतील, तिथे जाऊन मी आंदोलन करणार आहे, असा इशाराच धंगेकरांनी दिला आहे. कसबा पोटनिवडणुकीत यांनी किती पैसे वाटले, निवडणूक जिंकण्यासाठी यांनी काय काय केलं, पण जनतेने यांना भीक घातली नाही, आता ते त्याचाच राग ते मतदारसंघावर काढत आहेत. म्हणून त्यांनी कसब्याच्या विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी रद्द केला.

Ravindra Dhangekar Warning
Sujata Saunik IAS : जाणून घ्या, गेली 'तीन दशक' प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या ; IAS सुजाता सौनिक यांच्याबद्दल...

यावेळी बोलताना धंगेकर म्हणाले, "राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २० डिसेंबर २०२२ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, कसबा विधानसभा मतदार संघातील विकासकामांसाठी १० कोटीं रुपयांचा निधी मंजूर केला होता. पुणे महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासकामासाठी म्हणजेच रस्ते सुशोभीकरण जॉगिंग ट्रॅक,विसर्जन घाट, शौचालय दुरुस्ती, फुटपाथ , ऊर्दू शाळा, मस्जिदीमधील ड्रेनेज लाईन टाकणे,उद्यान विकास अशी जवळपास शंभर विकासकामे प्रस्तावित कऱण्यात आली होती.

या निधीसाठी आम्ही पाठपुरावा केला. तो निधी टेंडर प्रक्रियेला आल्यानंतर महापालिका आयुक्तांची आम्ही मान्यता घेतली. टेंडर लागणार होते. मात्र २७ जुलै २०२३ ला काढण्यात आलेल्या एका शासन निर्णय़ानुसार, कसबा मतदारसंघातील विकासकामांचा हा निधी पर्वती मतदार संघामध्ये वळवण्यात आला. अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा निधी वळवण्यात आला असून हा प्रकार कसब्यातील जनतेवर अन्याय करणारा असल्याचा आरोपही रवींद्र धंगेकर यांनी यावेळी केली.

Ravindra Dhangekar Warning
Sharad Pawar Vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना पवारांवरील टीका भोवणार; येवल्यातच काळे झेंडे दाखवून आंदोलन

मला त्रास द्यायचा असेल तर द्या पण कसब्यातील जनतेवर अन्याय करू नका. दिवंगत मुक्ता टिळक यांनी या विकासकामांचे नियोजन केले होते. आम्ही त्याचा पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला. पण या विकासकामांचे श्रेय धंगेकरला मिळेल या विचारातून त्यांनी निधी रद्द केला. असंही त्यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com