राज ठाकरे कसले ‘हिंदू जननायक‘ ? ते तर हिंदू-मुस्लिम एक्याचे ‘खलनायक’

ठाकरे यांची रविवारी औरंगाबादमध्ये मोठी सभा झाली. या सभेनंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
Ravikant Varpe
Ravikant VarpeSarkarnama
Published on
Updated on

पुणे : विकासाचे राजकारण करण्याऐवजी धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे राज ठाकरे हिंदू जननायक नव्हे, तर हिंदू-मुस्लीम ऐक्याचे खलनायक आहेत, अशी टीका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे (NCP) कार्याध्यक्ष रविकांत वर्पे (Ravikant Varpe) यांनी केली आहे.

Ravikant Varpe
राणा दाम्पत्याला आजही दिलासा नाही; तुरुंगातील मुक्काम वाढला

ठाकरे यांची रविवारी औरंगाबादमध्ये मोठी सभा झाली. या सभेनंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. या सभेत बोलताना ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केल्याने आज दिवसभरात राष्ट्रवादीकडून ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांनी ठाकरे यांच्यावर आज तोफ डागली.

Ravikant Varpe
आमदार गोरेंना बेड्या घालून तात्काळ अटक करा... महेश तपासे

या संदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना पक्षाच्या युवक आघाडीचे कार्यध्यक्ष रविकांत वर्पे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. वर्पे म्हणाले, ‘‘ बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे काम करणारे राज ठाकरे आता दोन धर्मात भांडण लावण्याचे काम करू लागले आहेत. आमचे नेते शरद पवार यांच्यावर ठाकरे चुकीच्या पद्धतीने टीका करीत आहेत. अर्थात ठाकरे यांच्या या टीकेने शरद पवार यांचे ५५ वर्षांचे अजिंक्य आणि अभेद्य राजकारण थांबणार नाही. त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.’’

Ravikant Varpe
अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा इशारा: हे कायद्याचे राज्य...

ते म्हणाले, ‘‘ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आता केवळ महाराष्ट्र मनोरंजन सेना झाली आहे. राज ठाकरे काहीही म्हणत राहिले तरी राष्ट्रवादी काँग्रेस या पुढच्या काळात इतिहासातील खोटेपणाचा विरोधात लढत राहील. महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्याऐवजी ठाकरे यांचे राजकारण धार्मिक द्वेषाकडे घेऊन जाणारे असून आमचा पक्ष कायमच अशा वृत्तीच्या विरोधात लढक राहिला आहे.’’

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे हे कुणी विसरू नये, असा सल्ला पवार यांनी ठाकरे यांना दिला आहे. राज ठाकरे महाराष्ट्रला चुकीचा इतिहास सांगत आहेत, अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला टार्गेट केल्यामुळे यापुढच्या काही दिवसात राज ठाकरे विरूद्ध राष्ट्रवादी असा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com