राणा दाम्पत्याला आजही दिलासा नाही; तुरुंगातील मुक्काम वाढला

मंगळवारी रमजान ईदमुळे न्यायालयाला सुट्टी असल्याने बुधवारी (ता. 4) त्यावर निकाल दिला जाणार आहे.
Ravi Rana, Navneet Rana
Ravi Rana, Navneet RanaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दांपत्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज अपूर्ण राहिली. मंगळवारी रमजान ईदमुळे न्यायालयाला सुट्टी असल्याने बुधवारी (ता. 4) त्यावर निकाल दिला जाणार आहे. राणा दाम्पत्याची न्यायालयीन कोठडी शनिवारी (ता. 7) संपणार आहे.

राणा दांपत्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. मागील आठवड्यात शनिवारी युक्तीवाद पुर्ण झाला होता. पण कामकाजाची वेळ संपल्याने न्यायालयाने आज (ता. 2) वेळ दिली होती. पण आजही इतर प्रकरणांमुळे निकाल राखून ठेवण्यात आला. न्यायालयाकडून आता चार तारखेला निकालाचे वाचन केले जाईल.

Ravi Rana, Navneet Rana
मनसेची राज्यभरातील महाआरती रद्द; राज ठाकरेेंनी दिले आदेश

दरम्यान, सरकारी वकील वकिल प्रदीप घरत यांनी राणा यांच्या जामीनाला विरोध करत त्यांचे कृत्य लोकशाहीला मान्य होण्यासारखे नसल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते की, लोकशाहीमध्ये नागरी हक्कांनाही मर्यादा आहेत. राणा पती-पत्नीने सर्व मर्यादा ओलांडत आव्हान दिले. पोलिसांनी राणा दांपत्यांना वेळोवेळी समजावून सांगितले. मात्र ते ऐकत नव्हते. वारंवार सोशल मिडियावरून आक्षेपर्ह वक्तव्य करत होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांशी बोलण्याचा पद्धतही राणां दापत्यांची चुकीची होती, असा दावा घरत यांनी केला होता.

हनुमान चालिसा पठणाच्या नावाखाली राणा दांपत्याला काहीतरी वेगळेच करायचे होते. सरकार कमकुवत होईल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा पद्धतीने त्यांचे वर्तन होते. त्यासाठी त्यांनी हिंदू धर्माचे कार्ड खेळले. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेने आता हिंदुत्व सोडलेले आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूने राणा दांपत्याने हे सर्व केल्याचा युक्तिवादही घरत यांनी केला होता. तर बेकायदेशीरपणे ही कारवाई करण्यात आल्याचे राणांच्या वकिलांकडून सांगण्यात आले होते.

Ravi Rana, Navneet Rana
नवनीत राणांची तब्येत बिघडली? वकिलांचं कारागृह प्रशासनाला पत्र

राजद्रोहाचा गुन्हा का दाखल झाला?

घरत यांनी राजद्रोह्याचे गुन्ह्याचे कलम राणा यांना का लावले, याची कारणमीमांसा केली. ``ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आहे. ते संपवण्यासाठी जारो कार्यकर्त्यासह मातोश्रीबाहेर हनुमान चालिकेचं पठण करणार आहोत असे वक्तव्य राणांनी केले. हे सरकारला दिलेले आव्हान होते. नवनीत राणा यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये त्यांनी चुकीची कागदपत्रे दिल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर अजूनही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे, याची माहिती घरत यांनी न्यायालयाला दिली. राणा माध्यमांद्वारे शिवसैनिकांना आव्हान देत होत्या. ते कशासाठी हे करत होत्या? शनीची साडेसाती महाराष्ट्राला लागली आहे. ती संपवण्यासाठी `मातोश्री`वर जाणार म्हणजे काय? हे कुणाला आव्हान होते? या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था बिघडू शकत नाही का, असेही सवाल घरत यांनी विचारले होते.

मुख्यमंत्र्याना उद्देशून राणा दांपत्याने अनेक आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या. एका लोकप्रतिनिधीच्या तोंडात राज्याच्या मुख्यमंत्री विषयीची ही भाषा शोभा देत नाही. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना हिजडा म्हटले गेले. त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना अजून अनावर झाल्या. दोन्ही आरोपी हे राजकिय पक्षांशी संबधित आहेत. या दोघांना जामीन मिळाल्यास ते तपासात अडथळे आणू शकतात. याचा परिणाम गुन्ह्याच्या तपासावर होईल, असा युक्तिवाद करत वकिल घरत यांनी जामीन अर्जाला विरोध केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com