Ajit Pawar On Sharad Pawar Threat: शरद पवारांना धमकी देणाऱ्या सौरभचा मास्टरमांईड कोण? अजित पवारांचा सवाल

Maharashtra Politics: शरद पवार यांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरच्या ट्विटर बायोमध्ये मी भाजपचा कार्यकर्ता आहे. असं लिहिलं आहे.
Ajit Pawar on sharad Pawar Threat:
Ajit Pawar on sharad Pawar Threat: Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Gets Life Threat: शरद पवार यांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरच्या ट्विटर बायोमध्ये मी भाजपचा कार्यकर्ता आहे. असं लिहील आहे. पण तो खरचं भाजपचा कार्यकर्ता आहे का, हेही माहिती नाही. पण जर तो भाजपचा कार्यकर्ता असेल तर त्यांच्या पक्षाने त्याला असं बोलायला सांगितलं आहे का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. याच वेळी सौरभचा मास्टरमांईड कोण आहे. हे कळलं पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली. तुमचाही दाभोळकर करु, अशा आशयाचा मेसेज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मिळाला, त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे तक्रारही दाखल केली. या धमकी प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Ajit Pawar on sharad Pawar Threat:
BJP Amravati Lok Sabha: जयंत डेहणकर अमरावती लोकसभेसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख !

अजित पवार म्हणाले की, अलीकडे जाणीवपूर्वक काही राजकीय पक्षांना बदनाम करण्याचा प्रकार सुरु आहेत. धमक्यांचे प्रकार वाढलेत, आपला पक्ष वाढवत असताना दुसऱ्या पक्षाची बदनामी करायची, आपला पक्ष वाढवत असताना, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची बदनामी करायची, त्यांच चारित्र्य हनन करायचं, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा, धमक्या द्यायच्या, याचा मी तीव्र शब्दातं निषेध करतो. (Sharad Pawar Threat News)

विचारांची लढाई विचारांनी लढावी, कार्यकर्त्यांनीही एकमेकांवर चिखलफेक करणं थांबवावं, ज्याने चूक केली असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अटक झाली पाहिजे, गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहेत.

Ajit Pawar on sharad Pawar Threat:
Death Threat To Sanjay Raut: पवारांपाठोपाठ राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी, सकाळचा भोंगा बंद..

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश रोवला. त्यांच्यानंतर अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळलं. पण काही राजकीय पक्षाचे लोक अत्यंत गलिच्छ पद्धतीने बोलत आहेत. त्यांना बोलता येतं इतरांना बोलता येत नाही का, असंही त्यांनी विचारलं. इतकेच नव्हे तर पक्षातील वरिष्ठानींही आपल्या कार्यकर्त्यांना हे सांगितलं पाहिते. वैचारिक मतभेद दाखवा, विचारांची लढाई विचारांनी लढा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com