Pune Loksabha By Election 2023: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी केव्हाही पोटनिवडणूक लागू शकते. या पार्श्वभूमीवर भाजप'ने जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे पुणे निवडणूक विभागाकडून पुणे लोकसभेसाठी तयारीही पूर्ण झाली आहे. (Who will be the Congress candidate for Pune Lok Sabha: 'These' names are being discussed?)
या निवडणुकीसाठी लागणारे मतदान यंत्रे (EVM) पुण्यात दाखल झाली आहेत. येत्या काही दिवसात निवडणूक केव्हाही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपचे दिवंगत खासदार गिरीष बापट यांची जागा कोण भरुन काढणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दृष्टीने भाजप आणि काँग्रसने निवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची चाचपणी सुरु झाली आहे. तर भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Pune Loksabha By-election)
पुणे लोकसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने (BJP) कंबर कसली आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी 40 वर्षांच्या दिर्घ काळानंतर काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर आता लोकसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांच्या जागी काँग्रेसनेही आपली ताकद पणाला लावली आहे. काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या विजयाने काँग्रेसला पुण्यात नवा चेहरा मिळाला. त्यामुळे आता त्यांच्या इच्छाही दुनावल्या आहेत. आमदार धंगेकर यांनाच लोकसभेच्या निवडणुकीसाठीदेखील उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. कांग्रेस कडून पुणे लोकसभेसाठी अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. पण भाजपला शह देण्यासाठी कोणता उमेदवार रिंगणात उतरणार यावर अद्याप काँग्रेसने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने तयारी सुरु केली असली तरी राष्ट्रवादीनेही या जागेवर दावा केला आहे. पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. मुळीक यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनीही काही दिवसांपूर्वी भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर्स शहरात लावल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी प्रशांत जगताप यांनीही, पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढू, अशी इच्छा व्यक्त केली होती. महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाला मिळणार, याबाबत चर्चा रंगल्या असताना लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहिल, असा दावा काँग्रेसने केला आहे.
दरम्यान पुणे हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१४ मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात अनिल शिरोळे आणि 2019 ला गिरीश बापट बहुमताने विजयी झाले होती. दोघांनीही तीन लाखांहून अधिक मते होती. सुरेश कलमाडी यांनीही काँग्रेसकडून वर्षानुवर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. पण मोदी लाटेत मागील दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पुण्याचा गड ढासळला. राज्यात शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची मिळून सरकार स्थापन झालं. पण कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपकडून गड हिसकावून घेतला. भाजपला हा पराभव जिव्हारी लागल्याने पुणे लोकसभेची ही पोटनिवडणूक रंगतदार होणार आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.