
Pune News : राज्याचे माजी मंत्री तानाजी सांवत यांचा मुलगा सोमवारी अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली होती. संपूर्ण पोलिस यंत्रणा मुलगा नेमका गेला कुठे, याचा शोध घेत होती. पण तो खासगी विमानाने बँकॉकला निघाल्याचे समोर आले आणि सावंतांचा जीव भांड्यात पडला. आता तो घरी परतला आहे. पण सावंत अपहरणाची तक्रार करण्यापर्यंत एवढे पॅनिका का झाले, मुलगा अचानक गायब कसा झाला, यामागची इनसाइड स्टोरी समोर आली आहे.
तानाजी सांवत यांचे धाकडे पुत्र ऋषिराज सावंत यांच्या प्रतापामुळे सोमवारी संपूर्ण पोलिस व प्रशासन यंत्रणा काही तास वेठीस धरली गेली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंत फोनाफोनी झाली. अखेर यामागचे सत्य समोर आले आहे. सावंतांच्या मोठ्या मुलाने मंगळवारी याबाबतचे स्पष्टीकरण दिले.
मीडियाशी बोलताना गिरीराज सावंत यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, काल साडे तीन वाजण्याच्या सुमारास लहान भावाचा मेसेज आला की, तो दोन दिवसांसाठी बाहेर चालला आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी तो दुबईला गेला होता. सहा-सात दिवसांपूर्वीच तो आला. आणि पुन्हा अचानक फोन बंद करून तो निघून गेला.
मुलगा अचानक गायब झाल्याने आई-वडील घाबरले. त्याच्यासोबत काहीच संपर्क होत नसल्याने पोलिसांशी संपर्क साधून माहिती घेण्यास सुरूवात केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याही संपर्क साधला. त्यानंतर असे लक्षात आले की, तो खासगी विमानाने बँकॉकला निघाला होता. त्याचे बिझनेसचे काही खासगी काम तिथे होते, असे गिरीराज यांनी सांगितले.
आठ दिवसांपूर्वीच तो दुबईला गेला होता, त्यामुळे लगेच बँकॉकला जाण्यासाठी घरचे नाही म्हणतील, म्हणून त्याने न सांगता या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्याचे कुठलेही अपहरण झाले नव्हते, असा स्पष्टीकरण गिरीराज यांनी दिले. पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी समजल्या. पोलिसांना वेठीस धरण्याचा प्रश्न नाही. कुणाच्याही घरात अशी घटना घडल्यानंतर हे घडू शकते. आई-वडिल, त्याच्या पत्नीवर प्रचंड ताण होता. त्यादृष्टीकोणातून आम्ही पोलिसांकडे धाव घेतली होती, असे गिरीराज यांनी स्पष्ट केले. घरात कसलाही वाद नसल्याचेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.