Ajit Pawar on Baramati Pattern : 'बारामती पॅटर्न' देशभर प्रसिद्ध का?; अजित पवारांनी सांगितलं कारण

Ajit Pawar Interview : अधिकाऱ्यांसह टीम वर्क करण्यावर दिला भर
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत झालेल्या विकासाचे कौतुक केले होते. त्यामुळे बारामतीचा ज्या पद्धतीने विकास झाल्या तो पाहण्यासाठी देशभरातून अनेक नेत्यांसह नागरिकही येत असतात. बारामतीचा हा विकासाचा 'पॅटर्न'साठी अनेक वर्षे लागली. त्यासाठी वर्षानुवर्षे कामे करत विकासाबाबत काळजी घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

पुण्यात 'साम' वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत अजित पवारांनी 'बारामती पॅटर्न'ची माहिती दिली. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "बारामती एका वर्षात उभी राहिली नाही. १९६७ साली शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व लाभले. त्यावेळी बारामती तालुक्यात २१ गावे बागायती २२ गावे जिरायती होती. त्या गावांचा विकास कसा होईल, यासाठी वेगवेगळ्या योजना त्यांनी राबविल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधु अप्पासाहेब पवार होते. अताही बारामतीच्या विकासासाठी अनेक जण राबत आहेत. त्यात सुप्रिया सुळे (Supriya Sule), राजेंद्र पवार इतर कुटंबीयांचा समावेश आहे."

Ajit Pawar
Ajit Pawar Interview : 2024 ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार; अजित पवारांचं रोखठोक विधान

तालुक्याच्या विकासात अधिकाऱ्यांचाही हातभार असल्याचे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, "तालुक्याचा विकास करताना प्रशासकिय अधिकाऱ्यांचेही महत्व आम्हाला माहिती आहे. तालुक्यात चांगले अधिकारी आणण्यावर भर दिला. बारामती तालुक्यात (Baramati) विविध योजना राबविताना अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. येणारा निधा सर्वांपर्यंत पोहचला की नाही, यावर लक्ष ठेवते. एका व्यक्तीमुळे संबंधित भागाचा विकास होत नाही. टीम वर्क महत्वाचे आसते. हाच पॅटर्न राबवून पिंपरी-चिंचवडचा विकास केला."

Ajit Pawar
Ajit Pawar Interview : ‘शिंदेंच्या गाड्या थेट मातोश्रीवर आणा’; पण अधिकारी ‘लॉयल’ राहिला अन्‌ सत्ता परिवर्तन झाले! : अजितदादांनी उलगडला सूरतचा रस्ता

पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी काही विशेष निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, "पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरात अनेक मोठ्या कंपन्या आहेत. मी खासदार असताना या कंपन्यात येणारे अनेक कामगार पुण्यातून येत होते. पिंपरीतील कंपन्यात दिवसभर काम करून ते पुण्यत जात होते. त्यावेळी हे लोक पिंपरी-चिंचवड परिसरात राहण्यास आले पाहिजे, अशी योजाना आखली. त्यानुसार आता पिंपरीचा कायापालट झाला. पिंपरीच्या विकासासाठी केंद्रातून राज्यातून मोठा निधी आणला. यासाठी अधिकाऱ्यांचीही साथ मिळाली."

Ajit Pawar
Ajit Pawar Interview : 'ठाकरेंसोबत आनंदाने तर चव्हाणांच्या काळात नाईलाज..' ; अजित पवार असं का म्हणाले?

आपल्या कामातून समाधान मिळाले पाहिजे, असेही दादा यावेळी म्हणाले. अजित पवार म्हणाले,"पिंपरी-चिंचवड आणि बारामती परिसरात सकाळी सहापासून आम्ही काम करतो. ते काम जबाबदारीच्या जाणीवेतून करतो. ते लोकांप्रती आपली कर्तव्य आहे. जनतेच्या विश्वसाला कुठेही तडा जाणार नाही असे काम करण्यावर भर देतो. आम्हालाही चांगले काम केल्याचे समाधान मिळाले पाहिजे."

यावेळी अजित पवार यांनी आघाडी सरकारमध्ये नगरविकास आणि गृहनिर्माण विकास खाती नसल्याची खंत व्यक्त केली. पवार म्हणाले, "सध्या शहरी आणि ग्रामीण असा भेद होता कामा नाही. दरम्यान सत्ता असतानाही १९९९ पासून २०१४ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगरविकास, गृहनिर्माण खाते नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीला शहरांचा विकास करता आला नाही. त्यामुळे २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने गृहनिर्माण खाते आवर्जून मागून घेतले. त्यातून झोपडपट्टी विरहीत शहरे करण्याचे काम हाती घेतले. त्याला थोडेफार यश मिळाले होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार पडले. सरकार अडीच वर्षे टिकले असते तर आणखी मोठे काम झाले असते."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com