Ajit Pawar Interview : 2024 ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार; अजित पवारांचं रोखठोक विधान

Political News : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार यांनी विविध विषयावर भाष्य केलं.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार यांनी विविध विषयावर भाष्य केलं आहे. यावेळी अजित पवारांनी आत्ताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार आहोत, असं सूचक विधान केलं आहे.

अजित पवार यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदाचं इतकं आकर्षण का? या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ''2004 सालीच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल एवढ्या जागांची संख्या जनतेने राष्ट्रवादीला दिली होती. काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. पक्षाची शिस्त राहावी, यासाठी वरिष्ठ सांगतील तसं ऐकावं लागतं. 2004 मध्ये आमची काँग्रेससोबत आघाडी होती. 71 जागा आमच्या आल्या होत्या''.

Ajit Pawar
Ajit Pawar Interview : ...तर आर आर पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते; अजित पवारांनी सांगितली आठवण !

''काँग्रेसच्या लोकांनी मानसिकता केलेली होती की, राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद जाईल. मात्र, काय घडामोडी घडल्या माहिती नाही. वरिष्ठ पातळीवरून निरोप आला की आपल्याकडे उपमुख्यमंत्री पद राहणार आहे. त्यावेळी विधिमंडळात आमच्या सदस्यांनी आर आर पाटील हे यांची निवड केली होती. त्यामुळे आर आर पाटील मुख्यमंत्री म्हणून दिसले असते. पण आम्हाला संधी मिळाली नाही", असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला; विनोद पाटलांचे राज्य सरकारला खडे बोल

''शेवटी प्रयत्न करणं आपलं काम असतं. नंतरच्या काळात आम्ही दोन नंबरचा पक्ष राहिलो. त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, म्हणून उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं'', असं अजित पवार म्हणाले. ''2024 ला मुख्यमंत्रीपदाचा दावा ठोकणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले,''2024 ला काय आत्ताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार आहे'', असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं.

(Ediited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com