Ajit Pawar Interview : 'त्या' दिवशी 'या' कारणाने अजितदादा झाले नॉट रिचेबल; स्वतःच केला खुलासा !

NCP News : ''राजकारणानी एक वेगळी पातळी गाठली आहे. प्रत्येकाला खासगी आयुष्य असतं...''
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार यांनी आज विविध विषयावर भाष्य केलं. तसेय यावेळी बोलताना त्यांनी एक दिवस अचानक नॉट रिचेबल झाल्याचे कारणही सांगितले आहे.

अजित पवार म्हणाले, ''राजकारणानी एक वेगळी पातळी गाठली आहे. प्रत्येकाला खासगी आयुष्य असतं. पण आता आम्हाला या सर्वाची सवय झाली आहे. आता त्या दिवशी मी नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या आल्या. पण मी नियोजित कार्यक्रम करत असताना मला अचानक पित्ताचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे मी घरी गेलो''.

''मला जागरण आणि अवेळी जेवणामुळे पित्ताचा त्रास होतो. नेमकी त्रास त्याच दिवशी कसा झाला माहित नाही. शेवटी प्रकृती आहे, त्रास झाल्यामुळे घरी गेलो आणि झोपलो. नंतर मी पेपरमधीच वाचलं की अजित पवारांनी पुढील दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द केले. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे नियोजित कार्यक्रम मी केले'', असा खुलासा अजितदादांनी केला.

Ajit Pawar
Ajit Pawar Interview ...तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते : अजित पवारांनी केला दावा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, होय 100 टक्के आवडेल. तसेच त्यांना 2024 ला मुख्यमंत्रीपदाचा दावा ठोकणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले,''2024 ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार आहे'', असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं.

(Ediited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com