Ramesh Chennithala : 'अडवाणी, जोशींप्रमाणे भाजप मोदींनाही आता राजकारणातून निवृत्त करणार का?' ; चेन्नीथलांचा बोचरा सवाल!

Congress Vs BJP : इंडिया आघाडीची 17 मे रोजी मुंबईतील BKC मैदानावर होणार जाहीर सभा
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala Sarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होत आहे. यामध्ये देशभरातील दहा राज्यांमधील 96 ज्यामध्ये महाराष्ट्रामधील 11 मतदारसंघाचा समावेश आहे. दुसरीकडे आगामी टप्प्यात निवडणूक होणार आहे अशा ठिकाणच्या मतदारसंघासाठी राजकीय पक्षांचा प्रचारही जोरदार सुरू आहे. या दरम्यान आरोप-प्रत्यारोपही मोठ्याप्रमाणावर पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपला पंतप्रधान मोदींबाबत एक खोचक सवाल केला आहे.

'भारतीय जनता पक्षाने 75 वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी(LK Advani) व मुरली मनोहर जोशी यांनाही 75 वर्ष वयाचे कारण देऊन राजकारणातून बाजूला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याच नियमानुसार 75 वर्ष झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान करणार का? या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावे.' अशी मागणी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramesh Chennithala
Shirur Lok Sabha Voting : सहकार मंत्री वळसे पाटलांनी ‘व्हीलचेअर’वर येऊन बजावला मतदानाचा हक्क!

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला(Ramesh Chennithala) पुढे म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात हिंदू-मुस्लीम, पाकिस्तान हे मुद्दे घेऊन धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम लोकसंख्या वाढली आहे असे नरेंद्र मोदी प्रचार सभेत म्हणाले. धार्मिक विभाजनाची भाषा करणे देशाच्या पंतप्रधानाला शोभत नाही. यातून जगात काय संदेश जातो, असा सवाल रमेश चेन्नीथला यांनी उपस्थित केला आहे.

तसेच दहा वर्षांत सरकारने काय काम केले त्यावर नरेंद्र मोदी(Narendra Modi) बोलत नाहीत. जनता मोदी सरकारच्या कारभाराला कंटाळली असून देशभर भाजपाविरोधी लाट आहे. लोकसभा निववडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होत असून इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

Ramesh Chennithala
Pune Lok Sabha Election : बिडकर महापालिकेच्या पराभवाचा वचपा काढणार की धंगेकर दाखवणार हिसका?

लोकसभा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईतील बीकेसी मैदानावर 17 मे रोजी इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. तसेच 18 मे रोजी इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.

या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी खासदार हुसेन दलवाई, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, चरणसिंह सप्रा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे आदी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com