Pune Lok Sabha Election : बिडकर महापालिकेच्या पराभवाचा वचपा काढणार की धंगेकर दाखवणार हिसका?

Political News : धंगेकरांनी बांधलेल्या कसब्यात सर्वाधिक 31 टक्के मतदान; महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर निवडणूक लढवीत आहेत.
Ganesh bidkar, Ravindra Dhangekar
Ganesh bidkar, Ravindra DhangekarSarkarnama

Pune News : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी चुरशीने सोमवारी मतदान होत आहे. महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर निवडणूक लढवीत आहेत. लोकसभेसाठी काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेले धंगेकर लोकसभेच्या निवडणुकीत देखील जायंट किलर ठरणार का ? अशी चर्चा त्यांना उमेदवारी दिल्यापासून सुरू झाली आहे.

सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत कसब्यात सर्वाधिक 31 टक्के मतदान झाले आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या धंगेकर (Ravindara Dhngekar) यांच्याकडून भाजपला (BJp) पराभव स्वीकारावा लागला होता. तर महापालिका निवडणुकीत या ठिकाणाहून भाजप नेते गणेश बीडकर (Ganesh beedkar) यांना पराभव स्वीकारावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या या मताच्या टक्केवारीमुळे बीडकर त्या पराभवाचा वचपा काढणार का ? धंगेकर पुन्हा एकदा हिसका दाखवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pune Lok Sabha Election)

Ganesh bidkar, Ravindra Dhangekar
Shirur Lok Sabha Voting : सहकार मंत्री वळसे पाटलांनी ‘व्हील चेअर’वर येऊन बजावला मतदानाचा हक्क!

पुणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान सुरू झाले असून सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदानात आघाडी घेतलेला कोथरूड विधानसभा मतदारसंघ आता मागे पडला आहे. दुपारी एक वाजेपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात संघात समावेश असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाचे मतदान सर्वाधिक झाले. दुपारपर्यंत कसब्यात 31.10 टक्के मतदान झाले.

पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड, कसबा, पर्वती, शिवाजीनगर, वडगावशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर कोथरूड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. पहिल्या दोन तासात विधानसभा मतदारसंघाचे मतदान सर्वाधिक झाले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत कोथरूडचा हा ट्रेंड तसाच टिकून होता. मात्र त्यानंतर कोथरूडचे मतदान कमी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर निवडणूक लढवीत आहेत. मोहोळ हे कोथरूड विधानसभा मतदारसंघात राहण्यासाठी आहेत. याच भागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांनी देखील नगरसेवक म्हणून कोथरूड भागातून प्रतिनिधित्व केलेले आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर कोथरूडमधील मतदान केंद्रांवर झालेले गर्दी महायुतीच्या आशा पल्लवित करणारी होती. अकरा वाजल्यानंतर मात्र कोथरूड मतदार संघातील मतदान केंद्रावरील गर्दी कमी होत गेली.

महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार रवींद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकरांनी भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात सुरुंग लावत विजय मिळविला होता.

रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता ते आमदार अशी ओळख धंगेकर यांची आहे. आजही ते आपल्या दुचाकीवरून कसबा विधानसभा मतदारसंघात फिरून नागरिकांच्या गाठीभेटी घेत अडीअडचणी समजावून घेत त्यांच्याशी संवाद साधतात. लोकसभेसाठी काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेले धंगेकर लोकसभेच्या निवडणुकीत देखील जायंट किलर ठरणार का ? अशी चर्चा त्यांना उमेदवारी दिल्यापासून सुरू झाली आहे.

Ganesh bidkar, Ravindra Dhangekar
Pune Lok Sabha Election Voting: हु इज धंगेकर? नंतर चंद्रकांतदादांचा आणखी एक इंग्लिश डायलॉग

सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदान कोथरूडच्या तुलनेत कमी होते. मात्र अकरा वाजल्यानंतर कसबा कसब्यातील मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी होऊ लागण्याचे पाहायला मिळाले. दुपारी एक वाजता सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान कसब्याचे झाले होते.

या मतदारसंघातून धंगेकर नेतृत्व करत असल्याने त्यांना म्हणणारा वर्ग मतदानासाठी बाहेर पडला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मतदान संपेपर्यंत हा ट्रेंड असाच कायम राहिला तर याचा फायदा धंगेकर यांना होणार की महायुतीचे उमेदवार मोहोळ यांच्या पारड्यात कसब्याची मते पडली, याचा खुलासा निकालाच्या दिवशी होणार आहे.

आमदार म्हणून काम करताना धंगेकर यांनी कसब्यात चांगले काम केले आहे. त्यामुळे मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने राहणार की एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या भाजपच्या उमेदवाराला येथून मताधिक्य मिळणार याचा फैसला निकालानंतरच होणार आहे.

Ganesh bidkar, Ravindra Dhangekar
Pune Loksabha Election Update: मनसेच्या किशोर शिंदेंचा पारा चढला, होमगार्डला दाखवला इंगा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com