Shirur Lok Sabha Voting : सहकार मंत्री वळसे पाटलांनी ‘व्हीलचेअर’वर येऊन बजावला मतदानाचा हक्क!

Lok Sabha Election 2024 : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे 27 मार्च रोजी घरात घसरून पडल्यामुळे त्यांच्या डाव्या मांडीचे हाड आणि डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून वळसे पाटील हे रुग्णालयात आहेत.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSarkarnama

Pune, 13 May : गेले काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये असणारे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (ता. १३ मे) ‘व्हीलचेअर’वरून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मंत्री वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या त्यांच्या गावातील मतदान केंद्रावर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केले. मतदानानंतर त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे 27 मार्च रोजी घरात घसरून पडल्यामुळे त्यांच्या डाव्या मांडीचे हाड आणि डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून वळसे पाटील हे रुग्णालयात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dilip Walse Patil
Beed Lok Sabha Voting : बीडमध्ये पहिल्या दोन तासांत 16.62 टक्के मतदान

तत्पूर्वी वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती. राष्ट्रवादीचा जाहीरनामाही त्यांच्या अनुपस्थितीतच जाहीर करण्यात आला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात होते. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी कायम डावपेच आखणारे वळसे पाटील हे प्रथमच निवडणुकीत सहभागी नव्हते, त्यामुळे त्यांची उणीव निवडणुकीच्या प्रचारात प्रकर्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला जाणवली.

दरम्यान, मध्यंतरी दिलीप वळसे पाटील यांनी जरा बरे वाटू लागल्यानंतर मंचर येथे आले होते. मंचर येथे येऊन त्यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी काही बैठका घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Dilip Walse Patil
Sambhajinagar Voting : छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्या दोन तासांत 19.53 टक्के मतदान

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मतदान हे शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांनी आज सकाळी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या आपल्या गावी जाऊन मतदान केले. मतदानासाठी ते व्हिल चेअरवर आले होते.

राज्यघटनेने जो मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. तो अधिकार सजग राहून नागरिकांनी बजावावा, असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले

Dilip Walse Patil
Lok Sabha Election 2024 voting : महाराष्ट्रात दुपारी 1 पर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक, माढ्यात सर्वांत कमी मतदान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com