Chandrashekhar Bawankule On Somaiya : २०२४ ला भाजप सोमय्यांना तिकीट देणार का ? बावनकुळेंचं एका वाक्यात उत्तर

Kirit Somaiya Viral Video Case : किरीट सोमय्या यांचे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी तिकीट कापले.
Kirit Somaiya - Chandrashekhar Bawankule
Kirit Somaiya - Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Pune : एरवी विरोधकांच्या तोंडचे पाणी पळविणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या आक्षेपार्ह अवस्थेतील चॅट व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे विरोधकांना राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपला घेरण्याची आयती संधीच मिळाली. याचदरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी किरीट सोमय्यांविषयी महत्वपूर्ण विधान केले आहे.

भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी मंगळवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर थेट भाष्य केले. या पत्रकार परिषदेत बावनकुळेंना सोमय्या हे २०२४ ला भाजपचे स्टार प्रचारक असणार का असा सवाल उपस्थित विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाजपची स्टार प्रचारकांची यादी केंद्रातून ठरते असे उत्तर दिले.

Kirit Somaiya - Chandrashekhar Bawankule
Neelam Gorhe in Monsoon Session : गोवा-सिंधुदुर्ग काही नाही, मुंबईत घ्या बैठक अन् तीसुद्धा विधानभवनात, नीलम गोऱ्हेंनी सुनावले...

२०२४ ला सोमय्यांना तिकीट देणार का ?

किरीट सोमय्या यांचे २०१९ च्या लोकसभा निवडणुकी(Lok sabha Election) वेळी तिकीट कापले. आता २०२४ ला त्यांना तिकीट दिलं जाणार का असाही प्रश्न करण्यात आला. त्यावर बावनकुळेंनी सोमय्यांना तिकीट द्यायचे की नाही हे समन्वय समिती ठरवेल असे म्हटले.

किरीट सोमय्या(Kirit Somaiya) आता अडचणीत सापडले आहेत. त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमय्या यांची बाजू समोर आली आहे. त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

Kirit Somaiya - Chandrashekhar Bawankule
Narwekar Offer To Balasaheb Patil : विधानसभा अध्यक्षांची शरद पवार गटातील बाळासाहेब पाटलांना मंत्रिपदाची ऑफर!

सोमय्या नेमकं काय म्हणाले..?

“मी कोणत्याही महिलेचं शोषण केलेलं नाही. माझ्यावर आरोप केले जात आहेत किंवा ज्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल केल्या जातायेत. त्याची सत्यता पडताळून चौकशी करण्यात यावी असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com