पिंपरीतल्या कारभाऱ्यांविरूद्धच्या लेटरबॉम्बची फडणवीस दखल घेणार का?

पक्षाचा सच्च्या कार्यकर्ता असल्याने या दोन्ही आमदारांनी पक्षाचे केलेले नुकसान पाहवत नाही.
Landge-Jagtap
Landge-JagtapSarkarnama

पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तुषार कामठे यांनी पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी गैरव्यवहार केले असल्याची तोफ डागली आहे.या दोन्ही आमदारांनी केलेल्या चुकीच्या कामासाठी सर्वसामान्य मतदार नगरसेवक व पक्षाला जबाबदार धरण्याची शक्यता असून त्याचा फटका भाजपाला बसू शकतो, अशी भीती कामठे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

पक्षाचा सच्च्या कार्यकर्ता असल्याने या दोन्ही आमदारांनी पक्षाचे केलेले नुकसान पाहवत नाही, असे कामठे यांनी पत्रात म्हटले आहे.कामठे यांनी हे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले असून पक्षहितासाठी या पत्राची दखल घ्यावी, अशी विनंती केली आहे.

Landge-Jagtap
रोहितजी...हर्बल तंबाखूच्या नावाने गांजाची वकिली करणारे मंत्री तुमच्याच पक्षात

आमदार लांडगे व जगताप यांनी मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेत हस्तक्षेप करत अनेक नगरसेवकांना त्रस्त केले आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नगसेवक त्यांच्या कारभारावर नाराज आहेत. आपण येत्या महापालिका निवडणुकीत तिकीटवाटपाच्या संदर्भात लांडगे गट किंवा जगताप गटाचा समर्थक, नातेवाईक किंवा स्नेही म्हणून निर्णय न घेता भाजपच्या मेहनती, सर्वसामान्य सच्च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी अशी विनंती या पत्राव्दारे शहा व फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांकडून मी भाजपाच्या आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा सध्या शहरात चालू आहे.परंतू मी भाजपच्या कोणत्याही आमदाराच्या गटातील म्हणून नव्हे तर भाजपचा एक सच्चा शिलेदार म्हणून काम करतो आहे. ज्या दोन आमदारांनी चुकीची कामे केली आहेत ते कदाचित स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पक्षाचा त्याग करू शकतात, तशी शक्यताही सध्या वर्तवली जात आहे. पण मी भाजपच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारण करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून पक्षाचे होणारे नुकसान पाहू शकत नाही, असे कामठे यांनी पत्रात म्हटले आहे.

Landge-Jagtap
पवारसाहेब... हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळणेबाबत

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाने कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचे आरोप विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने यापूर्वीच केले आहेत.दोन दिवसांपूर्वी शहर भेटीवर आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शहरातील भाजपाच्या दोन्ही कारभारी आमदारांनी शहर वाटून घेतल्याची टीका केली होती.

गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार लांडगे व जगताप यांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांमुळे येत्या पालिका निवडणुकीत भाजपाला त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे,अशी भीती त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.कारण या आमदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे खापर विरोधी पक्ष व जनता आपल्या नगरसेवकांवर फोडणार हे निश्चित,असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.चुकीची कामे केल्याने आपली चमडी वाचवण्यासाठी हे आमदार पक्षत्याग करू शकतात,असा बॉम्बही कामठे यांनी या पत्रातून टाकला आहे.

दरम्यान,याबाबत याअगोदरही मी तक्रारी केल्या आहेत.चुकीची कामे व गैरव्यवराबाबत पूर्वीही आवाज उठवला आहे. आंदोलने केली आहेत,असे कामठे म्हणाले.आज मेलसह फडणवीस यांना ‘व्हॉटसअप’वरही पत्र टाकले आहे.पक्षावर विश्वास असल्याने या पत्राची व त्यातील मुद्यांची दखल घेतली जाईल,असे कामठे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com