Pankaja Munde : कॉम्प्रमाईजचं राजकारण मला शक्य नाही; पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे?

Pankaja Munde News : ''महाभारतातील भीष्म पीतामह कॅरेक्टर मला शोभतं''
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pankaja Munde News : ''कॉम्प्रमाईजचं राजकारण करणं मला शक्य नाही'', असं मोठं विधान भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पार पडलेल्या चर्चासत्रात पंकजा मुंडे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तर देताना हे भाष्य केलं.

यावेळी चर्चासत्रामध्ये त्यांना गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पुढच्या राजकारणाकडे कसे बघता? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ''ज्या गोष्टी मी मनात बाळगून राजकारणामध्ये आले. त्या गोष्टी समाजासाठी करायची मुभा जर मला नसेल तर कॉम्प्रमाईजचं राजकारण करणं मला शक्य नाही'', असं भाष्य त्यांनी केलं.

Pankaja Munde
Koshyari : राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख...; कोश्यारींनी स्वत:च सांगितलं

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ''रस्त्यावर प्रत्येक किलोमीटरला एक एक्झिट असतो. तसं स्वाभिमानाचा एक्झिट कधीही चांगला. त्यामुळे मला राजकारणातून बाहेर पडण्याची भीती वाटत नाही. तसंच मी आता ज्या उंचीवर आहे, त्या उंचीवर येणं साध्या लोकांना जमत नाही''. असंही त्या यावेळी म्हणाल्या.

पंकजा मुंडेंना विधान परिषद किंवा दुसऱ्या ठिकाणी संधी का दिली जात नाहीय? असा दुसरा प्रश्न मुंडे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, ''या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. मला संधी न देणारेच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील'', असं त्या म्हणाल्या. तसंच ''महाभारतातील भीष्म पीतामह कॅरेक्टर मला शोभतं'', असं त्या म्हणाल्या.

Pankaja Munde
काँग्रेसचा मोठा नेता १५ ते २० आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार; ज्येष्ठ आयपीएस अधिकारी करताहेत मध्यस्थी?

त्यानंतर त्यांना भीष्माच्या जे वाट्याला आलं ते स्वीकारण्याची तयारी आहे का? असा प्रश्न पंकजा मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, ''भीष्माच्या वाट्याला जे आलं ते माझ्याही वाट्याला आलं'', असं म्हणाल्या. तसेच ''राजकारणामध्ये काही मिळवण्यासाठी झुकण्याची गरज नाही'', असंही मुंडे यावेळी म्हटल्या.

दरम्यान, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या या विधानामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.