Pune News : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बुधवारी चिन्ह वाटप झाले. यामध्ये अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलला 'किटली' तर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी 'कपबशी' हे निवडणुक चिन्ह मिळालं. त्यामुळे आता 'यशवंत'च्या निवडणुकीत 'किटली' विरुद्ध 'कपबशी' लढत रंगणार आहे.
यशवंत कारखान्याच्या( ( Yashwant Sahakari Sakhar Karkhana )) संचालक मंडळाच्या 21जागांसाठी दोन प्रमुख पॅनेलमधील 42 उमेदवारांसह तब्बल 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संचालक मंडळाची प्रत्यक्ष निवडणूक नऊ मार्च रोजी होणार आहे.
कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक रोहिदास उंद्रे यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप अण्णा गायकवाड, प्रकाश जगताप, विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीत ही चुरशीची निवडणूक होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या निवडणुकीसाठी 320 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एक तास वेळ वाढवून दिली होती. या वेळेत 266 उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. तरीही दोन्ही पॅनेलचे उमेदवार वगळता 12 उमेदवार रिंगणात आहेत.
अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन प्रमुख पॅनेलच्या प्रचाराला गुरुवारपासुन सुरुवात होणार आहे. प्रचारामध्ये दोन्ही पॅनेल एकमेकांवर जोरदार टीका करण्याची शक्यता आहे. कारखाना बंद का पडला ते निवडून आल्यावर आम्ही कारखाना कसा सुरु करणार, या संदर्भात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होणार आहेत.
निवडणुकीसाठी दोन्ही पॅनेलचे 42 उमेदवार वगळता गट क्रमांक 1 मध्ये सदानंद यशवंत बालगुडे, गट क्रमांक 2 मध्ये धनंजय नानासाहेब चौधरी, राजेश लक्ष्मण चौधरी, गट क्रमांक 3 मध्ये हिरामण नारायण काकडे, गट क्रमांक 5 मध्ये अमोल भिकोबा गायकवाड, भाऊसाहेब ज्ञानोबा गायकवाड, राजाराम पंढरीनाथ गायकवाड, गट क्रमांक 6 मध्ये अनिल रामचंद्र चोंधे हे उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अनुसूचित जाती जमाती गटात अंकुश अमृता कांबळे, इतर मागासवर्गीय गटात भाऊसाहेब ज्ञानोबा गायकवाड, मानसिंग बाळासाहेब गावडे, संतोष पोपट हरगुडे हे उमेदवार रिंगणात आहेत.
गट क्र. 4, उत्पादक व बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था, महिला व विमुक्त जाती जमाती या चार गटात दोन्ही पॅनेलचे वगळता इतर उमेदवार नसल्याने या चार गटात सरळ लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी न घेतलेल्या उमेदवारांनी आपल्या पॅनेलला पाठिंबा द्यावा, यासाठी दोन्ही पॅनेलचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.