Shivsena UBT News : ...अन् ठाकरे गटाने पुण्यात राणेंविरोधात केलं 'बँड-बाजा' आंदोलन!

Shivsena UBT Vs Nilesh Rane News : निलेश राणे यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी देखील केली गेली
Pune Shivsena UBT
Pune Shivsena UBTSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : पुणे महापालिकेने मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर तीन कोटी 77 लाख रुपये करबाकी असल्यामुळे कारवाई केली आहे. पालिकेने राणे यांच्या हॉटेलला सील ठोकले आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाने राणे कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून बुधवारी राणे यांच्या नावावर असलेल्या डेक्कन परिसरातील मालमत्तेसमोर बँड बाजा आंदोलन करत निषेध नोंदवला. यावेळी निलेश राणे(Nilesh Rane) यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Shivsena UBT
Pune News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, पुणे महानगरपालिकेचा कर बुडवणारे निलेश राणे हे मुंबईत, कोकणात राहतात आणि कर मात्र पुणे महापालिकेचा बुडवतात. राणे कुटुंबीय पुणे महापालिकेचा साडेतीन कोटींचा कर बुडून भाडे मात्र स्वत: खात असल्याचा आरोप मोरे यांनी केला.

याचबरोबर 'राणे यांच्याकडून करण्यात आलेल्या या कर बुडवेगिरीचा आम्ही निषेध नोंदवण्यासाठी त्यांच्या मालमत्तेसमोर बँड वाजवला. मात्र हा बँड पुणे महापालिकेने(Pune Municipality) वाजवणे आवश्यक होते. पुणे महापालिका सामान्य नागरिकांचा कर थकल्यानंतर त्यांच्या घरापुढे बँड वाजवते मात्र निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र असल्याने महापालिकेने त्यांच्या घरासमोर बँड वाजवला नाही का?' असा सवाल त्यांनी महापालिका प्रशासनाला केला.

Pune Shivsena UBT
Nitesh Rane : राणेंना पालिकेचा दे धक्का; अधिकाऱ्यांना शिव्या देणाऱ्या आमदारांच्या भावाच्या हॉटेलला ठोकले टाळे

तसेच 'पुढील आठ दिवसांमध्ये राणे यांनी कर न भरल्यास पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून बँड बाजा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मोरे यांनी दिला. तसेच या मिळकतीची नोंद महापालिकेच्या दप्तरी निलेश राणे यांच्या नावे असून ते कोकणात बसून या प्रॉपर्टीचं भाडं खात असल्याचा आरोप मोरे यांनी केला.

याशिवाय ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे म्हणाले, 'महापालिका तोंड बघून कारवाई करत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांना घाबरून महापालिका प्रशासनाने या ठिकाणी बँड बाजा वाजवला नाही. त्यामुळे आम्ही हा बँड बाजा वाजवला असून महापालिका जर हे साडेतीन कोटी रुपये वसूल करणार नसेल, तर पुढील काळामध्ये आणखी जोरदार आंदोलन करणार आहोत.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com