Vijay Shivtare
Vijay ShivtareSarkarnama

NCP's MLA Will Increase : होय, राष्ट्रवादीचे १० ते २० आमदार वाढतील; शिंदे गटाच्या नेत्याची कबुली

महाराष्ट्रातील जनतेने २०१९ आणि त्यापूर्वी २०१४ मध्येसुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादीला बाजूला ठेवले होते.
Published on

Vijay Shivtare News : राष्ट्रवादी काँग्रेस ही महाराष्ट्राच्या ठराविक भागात आहे. आता राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. महाविकास आघाडी म्हणून ते एकत्रित लढले, तर राष्ट्रवादीचे दहा-वीस आमदार वाढतील. त्यात फार फरक पडणार नाही, असा दावा शिवसेनेचे (शिंदे गटाचे) माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला. (Yes, NCP will increase by 10 to 20 MLAs : Shinde faction leader Confession)

विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) कोणाचाही विश्वास नाही. त्यामुळे ठराविक भाग सोडले, तर आता राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत, त्यात दहा-वीस आमदार (MLA) वाढतील. त्यात फार मोठा फरक पडणार नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेने २०१९ आणि त्यापूर्वी २०१४ मध्येसुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादीला बाजूला ठेवले होते. मात्र, उद्धव ठाकरेंनी धोका दिला. भाजप-शिवसेनेला बहुमत असतानाही स्वतःच्या इगोसाठी, महत्वकांक्षेसाठी आणि खुर्चीच्या प्रेमापोटी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला फसविले आहे. त्याचे भोग त्यांना भोगावे लागणार आहेत.

Vijay Shivtare
Bhagirath Bhalke News : राष्ट्रवादीला मोठा हादरा : भगीरथ भालके ‘केसीआर’च्या भेटीला; भालकेंसाठी खास विमान पाठविले

उद्धव ठाकरे आता जे पाप करत आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. सर्वाधिक फायदा कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांना साहेब साहेब करून सर्वांनी डोक्यावर घेतले आहे. उद्धव ठाकरे यांना एवढं साधं गणित कळत नाही की, भाजपचे १०५ आणि शिवसेनेचे ५६ हा सगळा विचार केला तर भाजपसमोर हरलेलं कोण आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यामुळे दोन नंबरच्या जागा म्हणून त्या दोन्ही काँग्रेसकडे जाणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Vijay Shivtare
Mangalveda Politics: पीए बदलून भालकेंची माणसं फुटायची नाहीत; गड्या तुला ते जमणार नाही, भगीरथ भालकेंचा आमदार आवताडेंना टोला

येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर अनुयायी यांना मिसगाईड करून कदाचित इतक्या प्रकारचे वाईट काम त्यांच्या हातून घडेल की, काळ्या अक्षरांनी त्यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात लिहिले जाईल, असा दावाही शिवतारे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com