Satyapal Malik Statement: सत्तेसाठी भाजप- नरेंद्र मोदी राममंदिरावरही हल्ला करवू शकतात ; सत्यपाल मलिकांचा दावा

Satyapal Malik Statement On PM Modi: 2019 मध्ये जे जाणीवपूर्वक पुलवामा हल्ला करवू शकतात ते काहीही करू शकतात.
Satyapal Malik - PM Narendra Modi
Satyapal Malik - PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: केंद्रातील मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळे पुलवामा हल्ला झाल्याचा गंभीर आरोप करणारे जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. सत्तेसाठी जे लोक पुलवामा हल्ला घडवू शकतात ते राममंदिरावरह हल्ला घडवून आणू शकतात, असा गौप्यस्फोट सत्यपाल मलिक यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सत्यपाल मलिक यांचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी राममंदिरासंंबंधी दावे केले आहेत.

दोन्ही (पीएम मोदी आणि भाजप) राजकीय फायदा मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. पीएम मोदी हे धोकादायक व्यक्ती आहेत, जे पुलवामा हल्ला घडवू शकतात ते, राम मंदिरावर हल्ला करू शकतात किंवा राजकीय फायद्यासाठी ते भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याची हत्या करू शकतात, असाही दावा मलिक यांनी केला आहे.

मोदींच्या निर्दयी निवडणूक रणनीतीवरही सत्यपाल मलिकांनी निशाणा साधला आहे. 2019 मध्ये जे जाणीवपूर्वक पुलवामा हल्ला करवू शकतात ते काहीही करू शकतात. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पुलवामासारख्या घटना पुन्हा घडवल्या जाऊ शकतात, असाही दावा सत्यपाल मलिकांनी केला आहे.

Satyapal Malik - PM Narendra Modi
Pulwama Attack: तर पुलवामा हल्ला झालाच नसता; सत्यपाल मलिकांनी सांगितलं तेव्हा काय घडलं...

सत्यपाल मलिक म्हणाले, “ निर्दयीपणे राज्य कसे करायचे हे पंतप्रधान मोदींना माहित आहे. पण 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते यशस्वी होणार नाहीत म्हणून त्यांनी आताच पद सोडणे चांगले आहे.

याचवेळी त्यांनी मणिपूर हिंसाचारावर मोठा दावा केला आहे, मणिपूरमधील हिंसाचारही सरकारचेच कारस्थान आहे. सरकार बदमाशांना शस्त्र पुरवून राज्यात अराजकता पसरवत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यावर त्यांना, तुम्ही इतक खात्रीशीर कसं सांगू शकता, असं त्यांना विचारले असता, हिंसाचारात वापरण्यात येणारी शस्त्रे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होत नाहीत. इन्सास रायफल बाजारात नसून सरकारच्या पायदळात उपलब्ध असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. इतकेच नव्हे तर मणिपूरमध्ये जमावाने मोठ्या प्रमाणात शस्त्रे लुटल्याचा दावाही त्यांनी फेटाळला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com