ZP Elections Maharashtra 2026: झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीला ‘नो एन्ट्री’; अजितदादांच्या आमदाराला भेगडे यांनी करुन दिली जुन्या विधानाची आठवण

Zilla Parishad Election 2026: मावळ तालुक्यातील स्थानिक राजकारणात निवडणुकीपूर्वीच मोठी हालचाल निर्माण झाली असून, महायुती विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Sunil Shelke | Bala Bhegade
Sunil Shelke | Bala BhegadeSarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये युती-आघाडीसाठी पक्षाची जुळवाजुळव सुरु झाली आहे. मावळ तालुक्यात भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणतीही युती केली जाणार नसल्याची ठाम भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी घेतली आहे.

बाळा भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत भाजपसोबत युती करून चूक झाली, असे आमदार सुनील शेळके यांनी जाहीरपणे म्हटले होते, याचा उल्लेख करत भेगडे यांनी राष्ट्रवादीसोबत पुन्हा युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ठामपणे सांगितले. राष्ट्रवादीशी युतीबाबत कोणतीही चर्चा अथवा बोलणी झालेली नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही भेगडे यांनी दिली. त्यानुसार शिवसेना शिंदे गटाला पंचायत समितीच्या टाकवे गणात, तर रिपब्लिकन पार्टी आठवले गटाला खडकाळे गणात उमेदवारी देण्यात येणार असल्याचे भेगडे यांनी जाहीर केले.

पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटातून मेघाताई प्रशांत भागवत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Sunil Shelke | Bala Bhegade
BMC मध्ये 'GEN Z'चा आवाज घुमणार; 30 वर्षांखालील 12 नगरसेवक

पंचायत समिती गणनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत इंदोरी गणातून श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे,वराळे गणातून रवींद्र निवृत्ती शेटे, चांदखेड गणातून सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले,उर्से गणातून बाळासाहेब नथू पारखी, काले गणातून सीमाताई मुकुंदराव ठाकर, कार्ला गणातून रंजनाताई सुरेश गायकवाड, टाकवे गणातून शिवसेना शिंदे गटाच्या अश्विनीताई सोमनाथ कोंडे (असवले) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महायुती विरुद्ध राष्ट्रवादी

उरलेल्या उमेदवारांची घोषणा आज संध्याकाळी करण्यात येणार आहे. मंगळवारी वडगाव मावळ येथे भव्य मिरवणूक काढून महायुतीचे सर्व १५ उमेदवार एकत्रितपणे अर्ज दाखल करणार असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेनंतर मावळ तालुक्यातील स्थानिक राजकारणात निवडणुकीपूर्वीच मोठी हालचाल निर्माण झाली असून, महायुती विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com