गोपीचंद पडळकरांची विकेट धनंजय मुंडे हेच घेणार...`

Sarkarnama ने आयोजित केलेल्या क्रिकेटनामा स्पर्धेचा उत्साह शिगेला.
Munde-Padalkar
Munde-Padalkarsarkarnama
Published on
Updated on

पुणे : `सरकारनामा`तर्फे आयोजित क्रिकेटनामा स्पर्धेचा फिव्हर वाढता असून येत्या शनिवारी व रविवारी (28 व 29 मे) रोजी ही स्पर्धा पुण्यात रंगणार आहेत. राजकीय आखाड्यात एकमेकांवर कुरघोड्या करणारे दिग्गज राजकारणी मैदानावर एकमकांसमोर येणार आहेत. या स्पर्धेत आमच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे हे गोपीचंद पडळकर यांची विकेट नक्की घेतील, असा विश्‍वास पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. (Dhananjay Munde Vs Gopichand Padalkar) तर घोडामैदान जवळ आहे, आताच हुरळून जाऊ नका, असा इशारा भाजपचे नेते आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला. (Sarkarnama cricketnama matches in Pune)

क्रिकेटनामा स्पर्धेच्या निमित्ताने राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्यादरम्यान अशाप्रकारचे सामने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहेत. भाजप, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, मनसे आणि आप या राजकीय पक्षांसह प्रशासन आणि पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांचेह दोन संघ यात असणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राज्यमंत्री विश्वजित कदम, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार धैर्य़शील माने, ओमराजे निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, अनिकेत तटकरे, महेश लांडगे, सुनील टिंगरे, संजय जगताप, संग्राम थोपटे, अमित झणक, मंगेश चव्हाण, सागर बालवडकर आदी वरिष्ठ नेते मंडळी यात सहभागी होणार आहेत. सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात या स्पर्धा झुळूक ठरणाऱ्या आहेत. पुण्यातील `सनी`ज वर्ल्ड` येथे या स्पर्धा दोन दिवस रंगणार आहेत. ते या स्पर्धेचे व्हेन्यू पार्टनर आहेत. धनंजय मुंडे आणि गोपीचंद पडळकर या दोघांनाही क्रिकेटची आवड आहे. त्यामुळे या दोघांतील सामना कसा रंगणार याची उत्सुकता आहे.

Munde-Padalkar
Sarkarnama-Cricketnama : मुंडे, पटोले, विश्वजित, नार्वेकर भिडणार मैदानावर

या स्पर्धेनिमित्त खेळाडूंच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. या स्पर्धांच्या निमित्ताने आज झालेल्या जर्सी अनावरण कार्यक्रमात राजकीय नेत्यांची जुगलबंदी रंगली. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, आपचे बाबासाहेब कांबळे युवासेनेचे किरण साळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याआधीच जिंकण्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी केला. ही स्पर्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस जिंकणार असून या स्पर्धेपासून सुरू झालेली विजयाची घौडदौड महापालिका निवडणुकीपर्यंत कायम राहील, असा दावा प्रशांत जगताप यांनी केला.



राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र असला तरी मैदानावर प्रत्येकाला स्वतंत्र खेळायचे आहे. मैदानात भाजपाशी मुकाबला असून आम्ही राज्यात नंबर वन आहोत हे लक्षात असू द्या टोला माजी महापौर मुरलीधर माहोळ यांनी जगताप यांना लगावला. शिवसेना नेहमीच कोणत्याही स्पर्धेत आघाडीवर असते. त्यामुळे या स्पर्धेतदेखील शिवसैनिक आपली चमक दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी व्यक्त केला.

राजकीय पक्षांच्या क्रिकेट स्पर्धा घेण्याची कल्पना अतिशय चांगली असून राज्यातील राजकीय वातावरण अधिक सदृढ होण्यास अशा उपक्रमांची मदत होईल, असा विश्‍वास आम आदमी पार्टीचे बाबासाहेब कांबळे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com