भारतीय विद्यार्थी सेनेला नावारुपाला  आणण्याच्या शिवसेनेत हालचाली 

 भारतीय विद्यार्थी सेनेला नावारुपाला  आणण्याच्या शिवसेनेत हालचाली 

मुंबई : भारतीय विद्यार्थी सेनेला (भाविसे) पुन्हा नावारुपाला आणण्याच्या हालचाली पुन्हा एकदा शिवसेनेने सुरू केल्या आहेत. एकीकाळी राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली भाविसेनेचे जाळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विणले गेले होते. गेल्या काही वर्षात भाविसे ही संगटना काहीशी अडगळीत पडल्याचे चित्र होते. त्यामुळेच पुन्हा या संघटेनाला नावारूपाला आणण्यासाठी पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे. 

भाजपशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपाठोपाठ (अभाविप)महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सेनेची क्रेझ होती. राज ठाकरे यांनी प्रारंभापासून विद्यार्थी सेनेचे काम केले होते. राज ठाकरेंनी शिवसेनेला रामराम केल्यानंतर मनसेची स्थापन केली. त्यामुळे भाविसचे महत्त्व कमी झाले. पुढे आदित्य ठाकरेंचे राजकारणात प्रमोशन करण्यासाठी युवा सेनेची स्थापना करण्यात आली. एकीकडे युवा सेनेची ताकद वाढत असताना दुसरीकडे भाविसेकडे दुर्लक्ष होत होते. भाजप, मनसे, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या पक्षाच्या विद्यार्थी संघटना नावारूपाला येत असताना शिवसेनेच्या या विद्यार्थी संघटनेची मात्र पिछेहाट होत गेली. 

पनवेल महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेनेचा पराभव झाल्यावर शिवसेनेशी संलग्न असलेल्या सर्व सेलचे पुनरूज्जीवन व प्रभाव वाढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. युवा सेना फोफावली असली तरी त्यामध्ये शिवसेनेमध्येच कार्यरत असणाऱ्या घटकांची नवीन पिढी सक्रिय झाली. महाविद्यालयात भाविसेचा नावलौकीक कमी झाला असून या संघटनेचे पदाधिकारी केवळ नामधारीच आहेत. 

महाविद्यालयांमध्ये बारावीनंतरचे विद्यार्थी नवमतदार असतात. हे नव मतदार अभाविपच्या माध्यमातून भाजपकडे वळत असल्याचे चित्र आहे. हा नवमतदार शिवसेनेकडे पुन्हा वळविण्यासाठी अभासेनेला पुन्हा एकदा ताकद देण्याची तयारी शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केली आहे. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com